‘ किसी नजर को तेरा
इंतजार आज भी है….’
जगजीतची ही गजल मला नेहमीच
व्याकुळ करत असते , का कुणास ठाऊक.
खरे तर आयुष्य सुरळीत चाललेले असतानासुद्धा
ही गजल अस्वस्थ करतेच करते.
कारण कॉलेजच्या जीवनापासून
आत्तापर्यंत बरेच काही हरवलेले असते ..
अनेकजणी ह्या ना त्या कारणांनी
जवळ आलेल्या असतात
आणि कुठेतरी अशा जातात
की आयुष्यभर पत्ताच लागत नाही …
माझे असे झालेले .
.परंतु पहिल्यांदा जी कोण ती भेटली ती पार
पुसून टाकताही येत नाही.
अशीच ती होती .
पहिली …वहिली….
एका कर्यक्रमात एकत्र आलो होतो..
जेमतेम तीन चार तास ..असतील…
त्या कार्यक्रमाची माझी आणि तिची ..
बरीच चर्चा मित्रांमध्ये झाली होती त्यावेळी
तेच पत्ताही घेतला होता…
पण तो हरवला…
अर्थात तिनेही घेतला होता…
तो कुठे गेला हे तिलाच माहित….
जवळ जवळ ती मला आणि माझ्या मित्रांना
चर्चेसाठी वर्षभर पुरून उरली…
आणि आता नुसतीच माझ्यापुरती कुठंतरी उरली होती…
आज ती अचानक आठवली…
ती या गाण्यामुळे ..
आणि कालच्या प्रसंगामुळे ….
अचानक दादर स्टेशनला रेल्वे पुलावरून
जाताना , समोरून एक चष्मा लावलेली स्त्री येत होती..
सुव्यस्थित होती…
लांबून दिसली….
सरळ बघून जात होतो…
जवळ येता येता….
तिला बघत होतो…
ती मला…
आणि मी तिला …
दोघांनी एकमेकांकडे बघीतले….
दोघांचेही निर्विकार चेहरे….
माझे मेंदूचे डिपार्टमेंट…ती कोण
हे विचार करण्यात गुंतले होते…
आम्ही दोघेही एकमेकांना
क्रॉस करून पास झालो होतो…
दहा पावले जाताच आठवले…
अरे ती ….
पटकन मागे बघीतले..
गर्दी पुढे सरकली होती आणि ती देखील..
मागे आलो…
ती गायब झाली होतो…
४० वर्षांचा काळ गेलेला होता..
परत मागे फिरलो
एक हुरहूर मागे घेऊन ..
आयला त्यावेळेलाही कच खाल्ली होती..
आणि आता माती …
— सतीश चाफेकर
४१
Leave a Reply