सकाळी रोजच्या प्रमाणे
अाँफीसची तयारी केली
पत्नीने चहा केला, डबा केला रोजप्रमाणे
मी ओफिसला
ती घरी
मुलींचा अभ्यास बघितला, शाळेसाठी तयारी केली
परत अाणायला घाई केली रोजप्रमाणे
मी घरी आलो
तिने पाणी दिलं
चहा केला रोजप्रमाणे
महिलादिनानिमीत्त
सोसायटीत कार्यक्रम आहे म्हणाली
माझ्यासाठी जेवण तयार करुन ठेवलं
……….नंतरच ती गेली कार्यक्रमाला
मी तिला शुभेच्छा दिल्या
रोजसारखीच आजही राबली
वर्षभर राबणार अशीच
अन
फेबुवर,वाँट्सअपवर नुसत्याच शुभेच्छा देत मी सुटलो
आज कारण मिळाले म्हणून….
असा …..
मी महिलादिन साजरा केला
— श्रीकांत पेटकर
Leave a Reply