अवतरणातला “मी” पणा
कशाला अंगात आणतोस
स्तुतीच्या मोहपाशांनी स्वतःचेच सांत्वन करतोस खोटी सुमने उधळली तर
छातीचा फुगा करतोस मी म्हणजे मीच? कशाला डोक्यात हवा भरतोस
पाप-पुण्य नैतिकतेच्या चांगल्या गोष्टी करतोस तुझेच तु परिक्षण कर
खरचं तू असा वागतोस? ओठात हास्य,मनी वैमनस्य
असा डाव का खेळतोस?
कुटनितीने गाफिलावर वार करुनी,
शेवट काय साधतोस? खाली हात आलास
खाली हातच जाणार माझ्यासारखा
“मीच”
याचा भ्रमनिरास होणार
धूसर जीवनाला सत्कर्माचे तेज मिळू दे
माझ्यातला “मी” गळू दे सार्थक जीवनाचा मार्ग मिळू दे
— अनिल शिंदे
Leave a Reply