जेष्ठ अभिनेत्री खुर्शीद उर्फ मीना शौरी यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९२१ रोजी झाला. सोहराब मोदी यांचा चित्रपट ‘सिकंदर’ मध्ये काम करुन मीना शौरी यांनी आपल्या करीयरची सुरवात केली. सोहराब मोदींनीच खुर्शीदचे मीना नामकरण केले.
‘सिकंदर’ नंतर मीना यांना शौरी यांनी ‘शालीमार’ व महबूब खान यांनी ‘हुमायूं’ मध्ये काम करण्याचा प्रस्ताव दिला. पण अचानक सोहराब मोदी यांनी मीना यांना एक नोटिस दिली की मीना यांनी तीन चित्रपटांसाठी साइन केले आहे. पण मीना यांनी दुसर्या चित्रपटात काम केल्या मुळे तीन लाख रुपये दंड द्यावा लागेल. मोदी यांची पत्नी महताब यांनी मध्यस्ती करुन ते तीस हजारावर आणले.
या दरम्यान मीना यांनी तीन विवाह केले. पहीला निर्माता, निर्देशक, अभिनेता जहूर राजा यांच्या बरोबर, अभिनेता अल नासिर व शौरी यांच्या बरोबर. असे सांगीतले जाते त्यांनी एकूण पाच विवाह केले होते. नंतर त्या पाकिस्तानात स्थाईक झाल्या. तिथे त्यांना २९ चित्रपट केले. मीना शौरी या पाकीस्तानातील पहील्या लक्स गर्ल ठरल्या होत्या.
‘चमन, ‘एक थी लड़की, हे त्यांचे इतर चित्रपट.
एक थी लड़की या त्यांच्या चित्रपटातील ‘लारा लप्पा लारा लप्पा लाई रखुदा, आडीडप्पा आडीडप्पा लाई रखुदा…’ अजुन ही स्मरणात आहे.
मीना शौरी यांचे ९ फेब्रुवारी १९८९ मध्ये निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply