अंहकाराचा पेटून वणवा, थैमान घातिले त्या मेघांनी
तांडव नृत्यापरि भासली, पाऊले त्यांची दाही दिशांनी…१,
अक्राळ विक्राळ घन दाट, नी रंग काळाभोर दिसला
सूर्यालाही लपवित असता, गर्वपणाचा भाव चमकला…२,
पृथ्वीवरती छाया पसरवूनी, चाहूल देई आगमनाची
तोफेसम गडगडाट करूनी, चमक दाखवी दिव्यत्वाची…३,
मानवप्राणी तसेच जीवाणे, टक लावती नभाकडे
रूप भयानक बघून सारे, कंपीत त्यांची मने धडधडे…४,
त्याच वेळी वादळ सुटूनी, देह घनाचा टाकी विखरूनी
गर्व हरण होऊन जाता, अश्रू पडती नयनामधूनी….५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply