मेघांनो पहा एकवार वळून,
हातचे काही राखू नका,
कोसळताना अडखळू नका,
झेपावताना लाजू नका,
पडतांना ‘धड-पडू’ असे करू नका,
आनंदाने बरसा, मनापासून बरसा !
तुमचा वर्षाव निरंतर सर्व जिल्ह्यांवर,
का रे मेघांनो नाराज असे मराठवाडा-विदर्भावर !
एवढं निष्ठुर झालात तुमच्या आईवर,
किती विश्वास ठेवला तुमच्यावर !
किती चटके सोसले तिने
तुमची वाट पाहून,
बळीराजाला समजावता
ती गेली भांबाहून !
बरेच जण रंगपंचमी खेळले तुमच्याबरोबर,
मारल्या पिचकाऱ्या कसल्याश्या रसायनांच्या तुमच्यावर !
नाहीरे मन तुमचे द्रवले तुमच्या आईसाठी
नाही ढळाढळा अश्रूंची झाली बरसात तिच्यासाठी !
न राहून विनविले पक्षांच्या थव्यांना तिने
तुमच्या नाजूक पंखाने, हळुवारपणे, प्रेमाने
घाला वारा माझ्या बाळांना,
थंड वाऱ्याच्या झुळकीने तरी
पाहू फुटतोका उमाळा त्यांना !
इतर जिल्हेही करतात प्रदूषण रोज
म्हणून त्याचा राग मराठवाडा आणि विदर्भावर?
जेव्हडे थेब बरसलात,
त्याच्या दुप्पट आत्महत्या झाल्या बरोबर !
मेघांनो पहा एकवार वळून !
जगदीश पटवर्धन
Leave a Reply