पावसाच्या थेंबांचा एक वेगळाच रव असतो,
एक ताल, एक नाद असतो
एक अवीट गाण्याचा बोल असतो
कि ऐकणाऱ्या कानांचा खेळ असतो
पावसाच्या येण्याचा काहीं नेम नसतो
कधी येईल कधी जाईल, त्याचा तो मुक्त असतो
भरून आलेल्या आभाळाला न पेलणारा भार असतो
तप्त झालेल्या मनाला दिलासा देण्यागत गार भासतो
पाऊस येण्याचा स्वतःचा एक बाज असतो
कोसळत धोधो येणारा तो कधी हलका अलवार असतो
कडाडत वाजत विजेसह तर कधी अलगद हळुवार असतो
सुख म्हणावे असे काहीं देण्या घेण्यासाठी आतुर असतो
पाऊस निथळताना पाहणं हाही एक सोहळा असतो
चिंब धरतीचा नवीन झालेला आविष्कार असतो
वर्षा ऋतूत सजलेल्या सृष्टीने ल्यालेला साज असतो
नववधूसम भासलेल्या निसर्गाचा मेघ मल्हार असतो
— वर्षा कदम.
Leave a Reply