जळत होती मेणबत्ती,
मंद मंद प्रकाश देवूनी ।
अंधकार भयाण असतां,
भोवताली उजेड पाडूनी…१,
बुडत्यासाठी काडीचा आधार,
अंधारी भासली तशी प्रकाशीं ।
असूनी ज्योत मिणमिणती,
त्या क्षणी वाटला सूर्य आकाशी….२,
वाटत नाहीं मूल्य कुणाला,
भरपूर पडल्या प्रकाशाचे ।
मेणबत्तीची ज्योत शिकवी,
साधे तत्त्व जीवनाचे….३
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply