मातेच्या उदरातून बाहेर आल्यावर एक वेगळा जीव म्हणून बाळ जगू लागते. त्याच्या शरीरातील श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था इत्यादि संस्था आपले कार्य सुरू करतात. फक्त जननसंस्था मात्र बाळ मोठे होईपर्यंत कार्यरत नसते. मुलगी मोठी होऊ लागली, की तिच्या शरीरात बदल होण्यास सुरुवात होते.
बाह्यात्कारी बदल आपल्या दिसतात, तसेच पोटातही बीजांडग्रंथी, गर्भाशय यांची वाढ होते.
त्यासाठी तिच्या शरीरात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन संप्रेरक बीजांडकोश करतात.
त्यांच्यावर नियंत्रण असते जिट्युटरी या ग्रंथीमध्ये तयार होणाऱ्या एफ. एस. एच. आणि एल. एच. या संप्रेरकांचे हे सर्व स्राव एकमेकांची पातळी योग्य प्रमाणात कशी राहील हे पाहात असतात. साधारणपणे १२/१३ व्या वर्षी मुलीला मासिकपाळी सुरू होते. आजकाल अनेक कारणांमुळे पाळी लवकर सुरू होऊ लागली आहे. १७-१८ वर्षांपर्यंत जर पाळी सुरू झाली नाही तर डॉक्टरांकडे जाऊन तपासण्या आणि इलाज कराव्यात. सुरुवातीला मासिकपाळी दर महिन्याला येत नाही. अनियमित येऊ शकते, रक्तस्त्रावही थोडा जास्त होऊ शकतो. या काळात मुलींच्या पोटात-कमरेत दुखते. पायही दुखतात.
त्यासाठी वेदनानाशक गोळ्या घेतल्यास हरकत नाही. फारच त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. सोनोग्राफी करावी. वाढत्या वयात आहार चौरस व पुरेसे उष्मांक मिळतात. मात्र नियमितपणे व्यायाम हवा, मनावर कुठल्याही प्रकारचे ताण घेऊ नये. मासिकपाळीच्या पहिल्या अर्ध्या भागात इस्ट्रोजनचा प्रभाव असतो. त्यामुळे गर्भाशयातील आवरण वाढते आणि बीजांडकोशामध्ये स्त्रीबीज वाढू लागतात. यातील एक स्त्रीबीज परिपक्व होऊन बाहेर येते आणि प्रोजेस्टेरॉनचा वाढू प्रभाव लागतो. स्त्रीबीज फलित झाले नाही तर दोन्ही संप्रेरकांची पातळी कमी होते आणि मासिकपाळी सुरू होते. रक्तस्रावात गर्भाशयाचे आतील आवरणही बाहेर टाकले जाते. हे आवरण जास्त जाड झाल्यास रक्तस्राव जास्त होऊ शकतो, जास्त दिवस होतो..
मन्दाकिनी पुरंदरे
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply