जीवनाचे एक महान सत्य असते. जे भगवत् गीतेमध्ये देखील सांगितलेले आहे.
जे होत आहे ते चांगल्या साठीच. जे होणार आहे ते देखील चांगल्यासाठीच.
जीवनातील प्रत्येक घटनेमध्ये कोणत्या ना कोणत्या रीतीने तुम्हास फायदा होतो. पण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या होणाऱ्या फायद्याबाबत नेहमी विचार करु नका.
आपण सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ आहात. ६०-७० वा अधिक वर्षे आपण जीवनाची खर्च केलीत. जर मागे वळून बघितल, तर तुम्हास दिसून येईल की तुम्ही लहान असताना ज्या जीवनाच्या मार्गाचा विचार केलांत, घटना कश्या व्हाव्यांत ही स्वप्ने रंगविलीत, तसे मुळीच झालेले नाही. सर्वच मार्ग एकदम भिन्न होत गेले. घटनाही वेगळ्या होत गेल्या. तरी देखील प्रत्येकजण म्हणेल
“भले कष्टमय जीवन का असेना, पण मी चांगल जगलो. मला माझ्या क्षमते नुसार, योग्यतेनुसार मिळत गेले.”
निसर्ग हा शेवटच्या अंकात तुम्हाला समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो.
“जे होत आहे ते चांगल्या साठीच. जे होणार आहे ते देखील चांगल्यासाठीच.”
हे जर जीवनाचे तत्वज्ञान असेल, तर ते तुमच्या अन्तरमनातून मान्य करीत जा. तशी स्वभावाची ठेवण निर्माण करा. अशा माणसाला सुख वा दुःख दोन्हीही सहज पचवण्याची शक्ती मिळत असते. मानसिक तणाव येथे कमी जाणवतो.
केवळ वर्तमानकाळातच जगा
भूतकाळातील चुकांबाबत पश्चाताप करु नका. भविष्याची चिंता करु नका. वर्तमान फक्त सफल करण्याकरीता संपूर्ण लक्ष केंद्रित करा. आजचा दिवस आपल्या हातात आहे. आज आपण रचनात्मक कार्य कराल तर कालच्या चुका सुधारतील आणि भविष्यांत निश्चितच फायदा होईल.
जीवन हे चक्रमय असते. काल्पनिक शक्तीनुसार तीन काळांत त्याचे विभाजन केले गेले. गेलेला तो भूतकाळ, येणारा तो भविष्यकाळ, आणि चालू सद्यःस्थितीतला तो वर्तमानकाळ. जरी हे तीन काळ वाटत असले तरी खऱ्या अर्थाने, फक्त दोन काळाचेच अस्तित्व माणसासाठी असते. भविष्य काळ येतो, वर्तमान काळाच्या सीमारेषेवरून छलांग मारीत भूतकाळांत अदृष्य होतो. भले काल्पनिक असो, वा असत्य असो, जगायचं असतं आम्हाला ते फक्त वर्तमान काळांत. तणावरहीत जगायचं असेल तर केवळ वर्तमान- काळाचा सहारा घेऊनच जगावं लागेल.भूतकाळातील अनुभव, कर्तृत्व यांची आठवण येणे चांगले, परंतु ते वर्तमान काळाचा आधार होऊ शकत नाही. भूतकाळातील गणितांची सांगड वर्तमानकाळाशी घालू नका. भविष्यकाळ तर अनिश्चित असल्यामुळे कल्पनेच्या झेपांना जागृत राहून आकार देत चला. फक्त वर्तमान काळांत जगण्याची संवय अंगीं ठेवा.
मानवी १०० वर्षाच्या मर्यादेत, तूम्ही सतत फक्त १० वर्षे जगण्याची वृत्ती मनाशी बाळगा. भूतकाळातली ५ वर्षे ही अनुभव व मार्गदर्शनासाठी आणि भविष्य काळातली फक्त ५ वर्षे जीवनाच्या योजने प्रित्यर्थ. पंचवार्षिक योजने प्रमाणे. ही योजना व्यवहारीक जीवनाची सांगड घालेल. वैचारीक झेप आणि कल्पना विलास यांना पायबंध घालेल. अशी आखणी तणावशीथिलता जीवनांत आणेल.
६ क्रमशः पुढे चालू
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply