भारत देशात खरया तिन जाती आहेत उच्चवर्गीय मध्यमवर्ग व गरीब. कागदावर व सरकार दरबारी बाकीच्या जाती आहेत.
आज उच्चवर्गीयांच्या मनोरंजनासाठी जस्टीन बिबर नवीमुंबईला आला आहे. कमीत कमी टिकीट आहे रू. ५००० ते जास्तीत जास्त रू. ७५,००० . उच्च वर्गीय उद्योग पती, सिनेकलाकार, उच्च अधिकारी व श्रीमंत व्यवसायीक व त्यांच्या मूलांनी स्टेडीयम फ़ुल झालय. स्टेडीयम ची क्षमता आहे ५६०००.टिकीटापोटी जमा होईल रक्कम कमीत कमी रू ५६००००००० स्पॉन्सर शिपचे वेगळे.ती रक्कम जस्टीन बिबर परदेशी घेवून जाईल. मेरा भारत देश बघा किती महान.
एका बाजूला दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबाचे पोट भरायला पैसे नाही म्हणून आत्महत्या करतोय. पिकवणारया शेतकरयांची तूर खरेदी ला पैसे नाही. शेतकरी कर्जमुक्ती करायला पैसे नाहीत.
दूसरया बाजूला सरकार अशा कार्यक्रमासाठी पोलीसांपासून ते वाहनव्यवस्थेपर्यंत सर्व व्यवस्था करतय. कर माफी करत आहे. आहे की नाही विरोधाभास.शेतकरयांनो संपावर जा, तूम्ही काढत बसा मोर्चा. तुमच्या कडे बघायला कोणा कडेही वेळ नाही.
Leave a Reply