मेरू आणि टॅब कॅबला मराठी समजत नाही..मराठीचा निवडणूकीय पुळका येणारे राजकीय पक्ष काय करतायत?
मी आता काही वेळापूर्वी ‘मेरू’ आणि ‘टॅब कॅब’ या टॅक्सीं कंपन्यांना अंधेरीवरून दहीसर येथे जाण्यासाठी टॅक्सी हवी म्हणून फोन केला..दोन्ही कंपन्यांनी आम्हाला मराठी समजत नाही आणि म्हणून तुम्ही हिन्दी किंवा इंग्रजीत बोला असा विनंतीवजा आदेश दिला..भयंकर अपमानीत वाटलं मला..मी अशा मुजोर टॅक्सीन् जायचा बेत रद्द केला आणि माझ्या वृद्ध आई-वडीलांना घेऊन रिक्शाने जाण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्रात राहून हे लोक अशी मुजोरी कशी काय करू शकतात?
एकेकाळी मराठे येतायत म्हटलं तरी उभा हिन्दुस्थान चळाचळा कापायचा.
कुठे गहाण ठेवली आपण आपली अटकेपार झेंडे लावणारी क्षात्रवृत्ती?
उठसुट शिवाजी महाराजांचे नांव घेऊन राजकारणाची पोळी भाजणारे ‘मराठी पक्ष’ कुठे आहेत? त्याच्या गप्प बसण्याचा अर्थ काय घ्यायचा?
मला माझ्या मराठी असण्याची प्रचंड लाज वाटू लागलीय..!!
– नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply