नवीन लेखन...

मेटल डिटेक्टर

मेटल डिटेक्टर ज्याला धातुशोधक यंत्र असे म्हटले जाते. त्याचा उपयोग पूर्वीच्या काळापासून होत आहे. अजूनही हे साधन कालबाह्य ठरलेले नाही उलट त्याचे महत्त्व आजच्या दहशतवादी कारवायांच्या जगात वाढतच चालले आहे. मेटल डिटेक्टरचा उपयोग अर्थातच धातूचा शोध घेण्यासाठी केला जातो. अगदी साधा मेटल डिटेक्टर हा ऑसिलेटर व एक कॉईल वापरून बनवलेला असतो यात ऑसिलेटरमध्ये निर्माण झालेला एसी विद्युतप्रवाह कॉईलमधून गेल्यानंतर त्यात चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते. जर आपण हे यंत्र विद्युतवाहक अशा धातूजवळ नेले तर धातू कॉईलजवळ आल्याने त्यात एसी करंट निर्माण होऊन अल्टरनेटिंग स्वरूपाचे चुंबकीय क्षेत्र तयार होते. जर मॅग्नेटोमीटरसारखे काम करणारी आणखी एक कॉईल घेऊन धातूमुळे चुंबकीय क्षेत्रात होणारा बदल पाहिला तर धातूचे अस्तित्व आहे हे समजते. मेटल डिटेक्टरमध्ये तीन भाग असतात ते म्हणजे स्टॅबिलायझर, कंट्रोल बॉक्स, शाफ्ट व सर्च कॉईल. यात जेव्हा आपण मेटल डिटेक्टर चालू करतो व शोध घ्यायचा त्या पृष्ठभागावर फिरवतो तेव्हा एक श्राव्य ध्वनी ऐकू येतो. काही मेटल डिटेक्टरमध्ये धातू आहे हे तर शोधले जातेच पण तो कुठल्या स्वरूपाचा आहे हे समजते. १९६० मध्ये औद्योगिक वापरासाठी असे मेटल डिटेक्टर तयार करण्यात आले होते.

त्यांचा उपयोग खाणीत केला जात असे पण नंतर विमानतळांवर त्यांचा वापर सुरू झाला. अन्नात धातूंची भेसळ ओळखण्यासाठीही त्यांचा वापर करता येऊ लागला. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस विद्युत सिद्धांताचे मानवी ज्ञान वाढले व त्यातून जर्मन वैज्ञानिक हेनरिच विलहेम डोव्ह यांनी इंडक्शन बॅलन्स सिस्टीम शोधून काढली व त्यामुळे मेटल डिटेक्टर अधिक सुटसुटीत बनले. अमेरिकी अध्यक्ष जेम्स गारफिल्ड यांच्या छातीतील गोळी शोधण्यासाठी अॅलेक्झांडर ग्रॅहम बेल याने मेटल डिटेक्टर वापरला पण गारफिल्ड ज्या बिछान्यावर झोपले होते त्यातही मेटल असल्याने या यंत्राची दिशाभूल झाली व गोळी सापडली नाही. त्यानंतर गेरहार्ड फिशर, लेफ्टनंट जोसेफ स्टॅनिसलॉ कोसाकी यांनी मेटल डिटेक्टरच्या रचनेत बरेच बदल केले. सगळ्यात आधुनिक असे बीट फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञान चार्लस गॅरेट यांनी शोधून काढले, त्यामुळे मेटल डिटेक्टरचे वजन कमी झाले. मेटल डिटेक्टर तीन प्रकारच्या तंत्रज्ञानावर चालवता येतात, त्यात बीएओ, व्हीएलएफ व पीआय हे तीन प्रकार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..