नवीन लेखन...

मी आणि वॉचमन

मी रोज एकाच ठिकाणी बसून असते. आणि ऐकू येत नाही म्हणून बोलण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे खूप कंटाळा येतो. वाटते की उठाव आणि या सर्व गोष्टीपासून लांब लांब जावं. पण असाहाय्य असल्याने शक्य नाही. तेंव्हा विचार करत होते की वॉचमनला सुद्धा असेच बसून रहावे लागते. सगळे जग शांत आणि आरामात झोपले आहे. अशा निरव वातावरणात त्याला एकटेच खुर्चीवर बसून राहणे भाग आहे. नोकरीत याचा विचार करून उपयोग नाही. बरं या मुळे रात्री पोटभर जेवण करता येत नाही. झोप झाली तरच आरोग्य चांगले राहते. शिवाय लवकरच उठून पार्किंग मधील गाड्या धुणे. आणि सोसायटीची स्वच्छता. कचरा पेटीत कचरा जमा करणे. आणि बऱ्याच गोष्टी त्याला कराव्या लागतात. त्याच्याशी कोण बोलत नाहीत. गाव व आपल्या माणसांना सोडून आलेला आहे. कसली अपेक्षा आणि कोणाकडून ठेवणार . सगळे जग मोठ्या उत्साहाने कामाला लागते. अशा वेळी झोपही घेता येत नाही. आणि रात्री सारखी झोपेची तृप्तता होत नाही. पित्त होते. अन्नाला चव येत नाही. आणि अनेक बाबी आहेत. या सारखे अजूनही काही लोकांना अशीच नोकरी करावी लागते. एखाद्या ठिकाणीच उभे राहणे. पहारा देणे. लक्ष ठेवणे. महत्वाच्या व्यक्तीची सुरक्षा करणे. हे सगळे खूपच अवघड व कठीण असते पण करावे लागते. त्यांचे व्यक्तीगत जीवन कसे जगत असतील याची कल्पनाही आपण करू शकत नाहीत..
थोडक्यात काय तर ही परवशता नशिबी आली की जमत नसेल तरी जमवावे लागते. तरणोपाय नाही.तसेही थोड्या फार फरकाने म्हातारपण हे वॉचमन सारखेच असते. दार उघडणे. आलेल्यांचे स्वागत करणे. तसेच घरचे बाहेरचे निरोप एकमेकांना देणे कुरियर घेणे आणि बरेच काही करुन कशातही लक्ष न घालता स्थितप्रज्ञ राहावे लागते. त्यामुळे जेंव्हा कधी मला चिडचिड होते तेव्हा मी हे सगळे लोक आठवते. मग लक्षात आणते की कुणाला कशासाठी तरी एका जागी बसून रहावे लागते. तशीच आपणही ही एक प्रकारची नोकरी करतोय असे समजून वाचन. लेखन. नामस्मरण. मैत्रीचे क्षेत्र वाढवणे. आत्मनिर्भर होणे. एवढे जरी करु शकतो ना? त्यांच्या पेक्षा आपण खूप चांगले आहोत हे समाधान मानून शांतपणे सहन करते…
— सौ कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..