नवीन लेखन...

मायक्रोवेव्ह ओव्हन

मायक्रोवेव्ह  ओव्हन हे स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठी वापरले जाणारे यंत्र आता फारसे नवीन राहिलेले नसले तरी त्याचा वापर मात्र अजून कायम आहे.

विसाव्या शतकातील तो एक महत्त्वाचा शोध मानला अर्थवेध असते. जातो. प्रगत देशात तर प्रत्येक घरात त्याचा वापर केला जातो. मायक्रोवेव्ह ओव्हन उष्णतेने अन्न शिजवण्याच्या ऐवजी प्रारणांच्या मदतीने अन्न शिजवते, रडार तरंगांचे तंत्र यात वापरलेले असते.

आपल्या नेहमीच्या अन्न शिजवण्याच्या पद्धतीत जो अन्नपदार्थ शिजवायचा आहे त्याला बाहेरून उष्णता मिळते व नंतर ती आतपर्यंत जाते. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये प्रारणे अन्नपदार्थातून आरपार जातात व ओव्हनच्या भिंतीला आदळतात व पुन्हा अन्नपदार्थातून जातात. मायक्रोवेव्ह प्रारणे त्यांची ध्रुवीयता म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिशा सेंकदाला अब्जावधी वेळा बदलत असतात. अन्नपदार्थात जे पाणी असते त्याच्याशी पहिल्यांदा मायक्रोवेव्ह म्हणजे सूक्ष्म लहरी अभिक्रिया साधतात. पाण्यातील रेणूंनाही ध्रुवीयता म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असते. त्यातील एक ऑक्सिजन अणू हा निगेटिव्ह तर दोन हायड्रोजन हे अणू पॉझिटिव्ह असतात. त्यामुळे पाण्यातील रेणू मायक्रोवेव्हच्या ध्रुवीयता बदलण्याच्या क्रियेला प्रतिसाद देतात व सेंकदाला अब्जावधी वेळा मागेपुढे हलतात. त्यामुळे पाण्याच्या रेणूंचे इतर रेणूंशी घर्षण होते, त्यामुळे अन्नपदार्थात उष्णता निर्माण होऊन तो शिजतो.

मायक्रोवेव्ह या रेडिओ लहरी असतात. त्या २५०० मेगाहर्टझ इतक्या कंप्रतेने या ओव्हनमध्ये वापरल्या जातात. रेडिओ लहरी या पाणी, चरबी व साखर यात शोषल्या जातात. यात मॅग्नेट्रॉन ही इलेक्ट्रॉन ट्यूब वापरलेली असते.  त्यातून निर्माण झालेल्या इलेक्ट्रॉन ऊर्जेचे रूपांतर सूक्ष्मतरंग ऊर्जेत केले जात असते.

१९४६ मध्ये रडारशी संबंधित प्रयोग करीत असताना डॉ. पर्सी स्पेन्सर यांना मायक्रोवेव्ह तंत्राचा शोध लागला. त्यांनी मॅग्नेट्रॉन हे यंत्र तयार केले त्यावेळी चाचणी करीत असताना त्यांच्या खिशातील चॉकलेट वितळलेले दिसले. नंतर त्यांनी अंडे ठेवून बघितले तर ते तडकले व नंतर असे दिसून आले की, रेडिओ लहरींच्या मदतीने अन्नपदार्थ शिजवता येतात. रेथियॉन कंपनीत त्यावेळी स्पेन्सर काम करीत होते.

मायक्रोवेव्ह ओव्हनला तुलनेने ऊर्जा कमी लागते व पदार्थ रूचकर बनतात. मायक्रोवेव्हमुळे केवळ अन्न गरम होते बाकीचे काहीत नाही त्यामुळे वीज वाचते. चटकन पदार्थ गरम करता येतात हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..