हर्षे चॉकलेट कंपनीचे संस्थापक मिल्टन हर्षे यांचा जन्म १३ सप्टेंबर १८५७ रोजी झाला.
अत्यंत गरिबीतून वर आलेले मिल्टन हर्षे हे या हर्षे चॉकलेट जनक. चॉकलेटचे जगात स्थान उंचवीणारे म्हणून त्यांची ख्याती आहे. एके काळी कँडी बनविण्या कामी प्रशिक्षणार्थी असलेला हर्षे हा नंतर चॉकलेट कंपनीचा मालक बनला. १९०३ मध्ये त्यांनी जगातील सर्वात मोठ्या चॉकलेट कंपनीची स्थापन केली. त्यांनी एक चॉकलेट ग्रामच उभे केले. त्यांनी कामगारांचे साठी एक सर्व सोयीनी युक्त असे सुंदर शहरच उभे केले. ‘हर्षे नगर’ म्हणून हा परिसर प्रसिद्ध असून क्रीडा, मनोरंजन, प्रदर्शन स्टेडियम, उद्यान, सार्वजनिक वाचनालय, वाद्यवृंद, चित्रपटगृह आदी उपक्रम तिथे चालविले जातात. त्यासाठी आवश्यक असणारी अंतर्गत बससेवाही इथे उपलब्ध आहे.
१९०९ मध्ये त्यांनी अनाथाश्रम उभा केला. त्यांनी टायाटानिक या बुडालेल्या जहाजाचे तिकीट काढले होते. पण आयत्या वेळी त्यांना काही अडचणीसाठी त्यांना ते रद्द करावे लागले हे तिकीट त्यांच्या संग्रहालयात ठेवाण्यात आले आहे. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकांच्या साठी त्यांच्या कारखान्यातील चॉकलेटचा खूप वापर झाला होता.
हर्षेची चॉकलेट फॅक्टरी प्रसिध्द आहे. तसेच हे एक मजेशीर पर्यटनस्थळदेखील आहे. पेनसिल्व्हानिया राज्यांत हर्षेची चॉकलेट फॅक्टरी साऱ्यांचेच आकर्षण आहे. अमेरिकेतील काही टूरमध्ये वॉशिंग्टन-नायगारा या रस्त्यावरील ‘हर्षे चॉकलेट वर्ल्ड’ हे ठिकाण आग्रहाने दाखविले जाते. ही फॅक्टरी पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. प्रवेशद्वारापाशी प्रवासी कंपन्यांच्या अनेक गाडय़ा अत्यंत पद्धतशीर उभ्या करून मग पर्यटकांना कंपनीच्या प्रवेशद्वारांतून आत सोडले जाते. तिथे पोहोचल्यावर एक छोटीशी उघडी गाडी आपल्या पुढय़ात येते. कर्मचाऱ्यांच्या सूचनेनुसार फिरत्या फलाटांच्या पुढे येणाऱ्या छोटय़ा फिरत्या डब्यात पर्यटकांना बसवले जाते. ती गाडी अत्यंत संथपणे अंधाऱ्या वातावरणातून पुढे जाते आणि अनेक दालनांतून पुढे जात चॉकलेट बनण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आपल्याला दाखवल्या जातात. रस्त्याच्या डाव्या-उजव्या बाजूने अनेक तपशीलवार माहिती दिसत राहते. तेथे सारी कामे यंत्राने चालतात. अतिप्रगत तंत्रज्ञान वापरून मानवी श्रमाशिवाय उत्पादने बनविली जातात. चॉकलेटस् कोको बियांपासून बनविली जातात. दर्जेदार कोको बिया जगातील विविध ठिकाणांवरून आणून त्या बिया साफ करणे, फोडणे, दळणे, गरम करून पुन्हा सुकवून त्यात साखर, दूध व अन्य पदार्थ योग्य प्रमाणात मिसळून त्याची पेस्ट बनवून सुकवून ती पसरवून वडय़ा पाडून आकर्षक पॅक केले जाते. या साऱ्या प्रक्रिया विविध दालनांतून पुढे सरकताना पर्यटकांना बघता येतात. प्रकाश व ध्वनीचा योग्य मिलाप व कॉमेंट्री यामुळे तिथलं वातावरण लहानथोरांना आकर्षित करणारं ठरतं. तिथे चॉकलेट मानवी सहाय्याशिवाय, पूर्ण यांत्रिकी पध्दतीने बनले जाते. छोटय़ा गाडीतून सुमारे २० मिनिटे फिरल्यावर बाहेर आल्यावर पर्यटकांना विनामूल्य चॉकलेटची चव चाखता येते. पर्यटक तिथे कितीही चॉकलेटस् खाऊ शकतो, हे विशेष.
मिल्टन हर्षे यांचे १३ ऑक्टोबर १९४५ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply