शशिकला शेषाद्री ऊर्फ मीनाक्षी शेषाद्रीने हिंदी व तमिळ चित्रपटांमधून अभिनय केला आहे. तिचा जन्म १६ नोव्हेंबर १९६३ रोजी झारखंड येथे झाला. मीनाक्षीने वयाच्या १७ व्या वर्षी १९८१ सालचा मिस इंडिया किताब जिंकला होता. मिस इंडिया किताब जिंकणारी ही सर्वांत तरूण होती. मीनाक्षी यांनी १९८२ साली पेंटर बाबू या हिंदी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. १९८३ च्या सुभाष घई-दिग्दर्शित हीरो या चित्रपटाने त्यांना कीर्ती मिळवून दिली. दामिनी या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. मीनाक्षी एक सक्षम अभिनेत्री असण्याबरोबरच एक उत्कृष्ट डान्सरसुद्धा आहे. मीनाक्षीने बॉलिवूडमधील जवळपास प्रत्येक मोठ्या निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेत्याबरोबर काम केले आहे.
अमिताभ बच्चनपासून ते विनोद खन्ना, ऋषी कपूर, अनिल कपूर या बड्या स्टार्सबरोबर मीनाक्षी झळकली आहे. ‘जुर्म’ आणि ‘दामिनी’ या सिनेमांसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअरचे नामांकन मिळाले होते. बॉलिवूडमधील एकेकाळची आघाडीच्या अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री आता सिनेमाच्या या ग्लॅमर दुनियेपासून खूप दूर झाली आहे. सिनेमे करण्यामध्ये आता फरसा रस नसल्याचं तिने स्वत: स्पष्ट केले आहे. ‘घातक’ हा तिचा शेवटचा सिनेमा होता. मीनाक्षी व्यवसायाने बँकर असलेल्या हरीश मैसूरबरोबर विवाहबद्ध झाली. लग्नानंतर ती आपल्या पती आणि कुटुंबीयांबरोबर अमेरिकेतील टेक्सास शहरात स्थायिक झाली. मीनाक्षीने फिल्म इंडस्ट्रीला जरी रामराम ठोकला असला तरीदेखील ती आपली नृत्याची आवड जोपासत आहे.
टेक्सासमध्ये स्थायिक झालेली मीनाक्षी तेथे कथ्थक अकादमी उघडली असून तरुणींना नृत्याचे धडे देते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकी पिडीया
Leave a Reply