नवीन लेखन...

खगोलशास्त्रावर आधारित गैरसमजुती कोणत्या?

खगोलशास्त्राबद्दल जनसामान्यांत अनेक समज-अपसमज प्रचलित असतात. मध्यंतरी अशी बातमी पसरली होती की मंगळ ग्रह पृथ्वीच्या खूपच जवळ येणार असून तो पौर्णिमेच्या चंद्राइतका मोठा दिसेल. ही बातमी खोटी होती. सर्व ग्रह हे सूर्याभोवती फिरताना ठरावीक कालाने परस्परांजवळ येतात. पण जवळ आल्यावरही थोडा तेजस्वी दिसण्यापलीकडे मंगळ नुसत्या डोळ्यांना मोठा दिसत नाही. कारण तो फारच दूर आहे.

चंद्राएवढा दिसण्यासाठी मंगळ हा आपल्यापासून साडेसात लाख किलोमीटर अंतरावर असायला हवा. मंगळ पृथ्वीच्या अगदी जवळ असतानाही तब्बल साडेपाच कोटी किलोमीटर अंतरावर असतो. गेल्या जुलै महिन्यातील खग्रास सूर्यग्रहणाआधी अशीच एक इ-मेल पाठविली जात होती. ग्रहणामुळे अरबी समुद्रात महाप्रचंड लाटा निर्माण होणार असून मुंबई बुडण्याचा धोका आहे. प्रत्यक्षात सूर्य-चंद्रादी ग्रहणांचा त्सुनामी लाटा, वादळे, भूकंप, ज्वालामुखी, यादवी युद्धे ॥ आदी घटनांशी कसलाही संबंध नाही. एका अवकाशस्थ वस्तूने दुसरीला झाकणे किंवा तिची सावली दुसऱ्या अवकाशस्थ वस्तूवर पडणे इतक्या या सरळ-साध्या खगोलशास्त्रीय घटना आहेत. परग्रहवासियांची पृथ्वीभेट, उडत्या तबकड्या यांना कोणताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. एरिक व्हॅन डॅनिकेन या गृहस्थाने अशी अनेक पुस्तके लिहिली होती. त्यात परग्रहवासी पृथ्वीवर येऊन गेल्याचे दाखले दिले होते. हे सर्व निखालस खोटे असल्याचे सिद्ध झाले. पण त्याआधीच एरिकने आपली लक्षावधी रुपयांची पुस्तके विकून भरपूर पैसे मिळविले होते.

मानवाने चंद्रावर कधीच पाऊल ठेवले नव्हते असे म्हणणारा एक गट आज अस्तित्वात आहे. त्या गटाची सर्व विधाने आज वैज्ञानिक रितीने खोडून काढली गेली आहेत. आजपर्यंत अनेक अंतराळवीर चंद्रावर जाऊन आले आहेत, हे सत्य आहे. आता तर भारतही या स्पर्धेत उतरला आहे.

-मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..