चमकत होते अगणित तारे, आकाशी लुकलुकणारे
लक्ष्य वेधूनी घेतां घेतां, फसवित होते आम्हांस सारे….१
कधी जाती चटकन मिटूनी, केंव्हां केंव्हां दिसती चमकूनी
खेळ तयांचा बघतां बघतां, चित्त सारे गेले हरपूनी….२
एक एक जमती नभांगी, धरणीवरल्या मांडवी अंगीं
संख्या त्यांची वाढतां वाढतां, दिसून येती अनेक रांगी….३
हसतो कुणीतरी मिश्कील तारा, डोळे मिटतो दुजा बिचारा
स्थिर राहूनी लपतां लपतां, खेळांचा वाढवी पसारा….४
निशाराणीची मुले ही सारी, खेळत राहती रात्री बिचारी
उषाराणीशी बघतां , निघूनी जाती आपल्या घरी….५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply