मिथुन चक्रवर्ती यांनी बी.एस.सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून अभिनयाचे अधिकृत शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १६ जून १९५० रोजी झाला. करिअरच्या सुरूवातीला ऍक्शन आणि डान्ससाठी मिथुन चक्रवर्ती यांची खास ओळख निर्माण झाली होती. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटाने मिथुन चक्रवर्ती यांनी खऱ्या अर्थाने डान्सिंग स्टार बनवले. तर मृगया या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होतो. मिथुन चक्रवर्ती यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दोन फिल्म फेयर पुरस्कार, दोन स्टारडस्ट पुरस्कार आणि एक स्टार स्क्रीन अवॉर्ड मिळाला आहे. ८० च्या दशकात डिस्को डान्स हा नृत्य प्रकार त्यांनीच लोकप्रिय केला. आपल्या आगळ्या-वेगळ्या डान्स शैलीमुळे ते आजही लोकप्रिय आहेत.
सुरक्षा, तराना, हम पांच, शौकीन, वारदात, डिस्को डान्सर, प्यार झुकता नही, डान्स-डान्स यांसारख्या चित्रपटात त्यांनी प्रमुख नायकाची भूमिका साकारली आहे. १९९० मध्ये आलेल्या ‘अग्नि पथ’ चित्रपटातील दक्षिणात्य व्यक्तीची त्यांची भूमिका आजही कौतुकास्पद वाटते. मिथुन चक्रवर्ती यांचा १९९५ मध्ये आलेला ‘जल्लाद’ चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेने त्यांनी लोकांच्या मनात आपले वेगळे स्थान बनवले. तर २००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘गुरू’ चित्रपटातील एडिटरची भूमिकाही देखील उल्लेखनिय होती.
मिथुन चक्रवर्ती यांनी वीर, गोलमाल ३, हाऊसफुल २, ओह माय गॉड, खिलाडी ७८६, कांची, किक आणि हवाईजादा यांसारख्या चित्रपट केले आहेत. मोठय़ा पडद्याप्रमाणेच छोटय़ा पडद्यावरील डान्स शो डान्स इंडिया डान्समध्ये ते ग्रँडमास्टर रूपाने लोकांपुढे आले. मिथुन चक्रवर्ती यांनी हिंदीसह बंगाली, उडिया आणि भोजपूरी चित्रपटात काम केले.
केवळ चित्रपट अभिनेता म्हणून नव्हे तर सामाजिक कार्यकर्ता, उद्योजक आणि राज्यसभा सदस्य अशी मिथुन चक्रवर्ती यांची ओळख आहे. १९८२ साली त्यांनी अभिनेत्री योगिता बाली यांच्याशी लग्न केले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply