नवीन लेखन...

मित्र! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – १२

युद्ध चांगलंच पेटलं होत. ऍटोमॅटिक मशिनगन मधून गोळ्यांचा वर्षाव होत होता. शत्रूला त्या बंकरचा ठाव ठिकाण्याचा अचूक अंदाज आला असावा. डोक्यावर दर पाच मिनिटाला विमानाची धडकी भरवणारी घरघर आणि त्यानंतर कानठळ्या बसवणारे बॉम्ब हल्ले होत होते.
“सर, सुरजित परतलेला दिसत नाही! आम्ही सोबत स्ट्राईक साठी गेलो होतो! युनिट लीडरच्या ऑर्डर प्रमाणे आमच्या टीमचे दोन भाग झाले होते. रिव्हर्सिंगच्या वेळेस शत्रू जागा झाला. आणि त्या मुळेच हा भडका उडालाय!” वीरेंद्र म्हणाला.
“हू! जे सुखरूप परतले ते जवान आपले! अश्या हल्ल्यात मला वाटत नाही, मागे राहिलेला कोणी जिवंत असेल!” कमांडिंग चीफ थापा, वीरेंद्रकडे पहात म्हणाले.
“सर, हा वणवा पहाता आपले म्हणणे बरोबर आहे. पण मी आणि सुरजित सोबत मिलिटरी जॉईन केली. एकाच गावचे. एकत्र ट्रेनिंग घेतलंय. माझा सच्च्या यार आहे. मी, तो जखमी असेल तर घेऊन येतो, नसता त्याचे शव तरी आणीन! क्राव्हलिंग करत परतताना मी त्याला, या बँकर पासून हजार पावलावर पाहिलं होत. तेव्हा तो जिवंतच होता. मला जाण्याची परवानगी द्या सर!”
“मुर्खा, एक वरिष्ठ म्हणून अशी घातक परवानगी मी देणार नाही! तो बहुदा मेलाच आहे! आणि अश्या पेटल्या युद्धात तू गेलास तर, तुझे हि जीवन पण धोक्यात येईल! नव्हे ती आत्महत्याच असेल!” कमांडिंग चीफ थापा,परवानगी नाकारून निघून गेले!
वीरेंद्रने आपल्या मनाचा कौल मान्य केला, वरिष्ठानची परवानगी झुगारून तो खंदका बाहेर पडला!
०००
अजून फायरिंग तसूभर हि कमी झाली नव्हती, कि प्रतिकार कमी झाला होता! तासाभराने वीरेंद्र खांद्यावर सुरजितला घेऊन बंकरमध्ये परतला. त्याच्या अंगभर गोळ्यांनी जखमा केल्या होत्या. तातडीने लेफ्टनंटनी थापा सराना निरोप पाठवला. थापांनी त्या दोघांना तपासलं.
“वीरू, बघ मी सांगतील होत तसेच झाले! हा तुझा मित्र, सुरजित मरण पावलाय! आणि तू हि किती जखमी झालास? अरे, तुझ्या या जखमा जीव घेण्या आहेत! तू ज्याच्या साठी गेलास तो, तुझा मित्र जिवंत हाती लागलाच नाही! काय उपयोग झाला तुझ्या वेड्या धाडसाचा?”
“माझा मित्र जिवंत हाती लागला नसेल तरी, माझे जाणे सार्थकींच लागलंय, सर! मी त्याच्या जवळ पोहंचलो तेव्हा तो जिवंतच होता! ‘ मित्रा, कोणी नाही तर तू नक्की येशील, याची मला खात्री होती!’ या त्याच्या शेवटच्या वाक्यापुढे, मी घेतलेली रिस्क फार किरकोळ होती, सर!”
थापांनी इशारा केला तसे वीरेंद्रचा स्ट्रेचर डॉक्टरांनी उपचारासाठी हलवले.
“गेट वेल सून! माय डियर कार्टून! डीसओबिडियांसी साठी कोर्ट मार्शल मलाच करावं लागणार! वेड कार्ट!” दगडी थापां स्वतःचे डोळे पुसत पुटपुटले.
मित्रांनो, हि झाली कथा.
मैत्रीची ‘व्याख्या’ करण्याची माझी कुवत नाही! (आज कालची मैत्री पहिली कि, या नात्याचे सगळ्यात ज्यास्त वाभाडे निघालेले दिसतात. ज्यांना आपण खूप जवळचे समजतो, तेच—— जाऊ द्या.बरेचदा आपण जे करतोय ते शहाणपणाचे कि गाढवपणाचे हे, त्या गोष्टीकडे पहाण्याच्या दृष्टिकोनावर अवलूंबून असते.
‘कोणी नाही तर, तू नक्की येशील याची मला खात्री आहे!’ असा मित्र असेल तर त्याला सांभाळा. कारण जेव्हा सगळे दूर जात असतात, तेव्हा फक्त मित्र जवळ येत असतो!

नसता “हमारी जेब मे, जरासी छेद क्या हुई,
सिक्कोसे ज्यादा, रिश्ते गिरगाये!”  अशी म्हणण्याची पाळी येते!

— सु र कुलकर्णी.

तुमच्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye!
(मूळ कल्पना नेट वरून.)

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..