मित्रवंदाचा दीप विझे,
सोनसंध्याकाळ झाली,
संधिकालाचे आगमन होता,
पाखरे घरां निघाली,–!!!
आकाश काळवंडून गेले,
चांदणी उगवू लागली,
तम दाटता भोवती,
धरती बेचैन झाली,–!!!
प्रकाशाचे किरण संपले,
अंधाराचा नाच खाली,
आभाळातून चंद्रमा पाहे,
वसुंधरा अंधारलेली,–!!!
तिला पाहून बुडालेली,–
चांदवा पसरे रजत-प्रकाश,
ओहोटीच लागलेली,–
समुद्रकिनारी कुठे गाज,–!!!
रजनीच्या कुशीत झोपे,
चराचर सृष्टी सावकाश,
पृथा चिंतातुर होई,–
तिला भास्कराची आंस,–!!!
दिनरात त्याची साथ लाभो,
हीच तिची असते कामना,
पण इच्छा पूर्ण न होते,
भाग्य करते अशीच वंचना,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply