पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील आमदार माधुरी मिसाळ यांचा जन्म १९ एप्रिलला झाला.
पर्वती विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या आमदार माधुरी मिसाळ यांचे मतदारसंघातील काम आणि संघटन वाखाणण्याजागे आहे. राज्य विधी मंडळाच्या लोकलेखा समितीच्या सदस्य म्हणून त्या काम करीत आहेत. पुणे महापालिका निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक त्यांच्या पर्वती मतदारसंघातून निवडून आले होत्या. त्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले होते.
आमदारकीच्या आधी पुणे महापालिकेत २००७ मध्ये महात्मा फुले मंडई या वॉर्डातून नगरसेविका म्हणून त्या प्रथम निवडून आल्या होत्या. त्यानंतर २००९ मध्ये त्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या. २०१४ मध्ये त्या दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झाल्या. तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुणे पर्वती मतदारसंघात माधुरी मिसाळ यांनी विजयी मिळवला.
तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या मिसाळ यांची पर्वती मतदारसंघावर मजबूत पकड आहे. भाजप पक्षाच्या चिटणीस, महाराष्ट्र प्रदेशच्या संयोजिका म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांनी काही काळ पुणे भाजप शहराध्यक्ष पद सांभाळले होते. माधुरी मिसाळ या पहिल्या भाजपच्या महिला शहराध्यक्ष ठरल्या होत्या.
विद्या सहकारी बॅंकेच्या माजी अध्यक्ष होत्या, आता उद्यम विकास बॅंकेच्या त्या विद्यमान संचालक आहेत. शिक्षण प्रसारक मंडळी या पुण्यातील प्रमुख शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळावर संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर राज्य मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. मात्र राजकीय तडजोड म्हणून त्यांच्याऐवजी अन्य महिला आमदारांना संधी देण्यात आली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply