आमदार विनायक मेटे यांचा जन्म ३० जून १९६६ रोजी राजेगाव (ता. केज) येथे झाला.
पाच वेळा विधान परिषद सदस्यत्व मिळविण्याचे रेकॉर्ड एकमेव विनायक मेटे याच्या नावावर आहे. राजेगाव (ता. केज) येथील रहिवाशी असलेले विनायक मेटे व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत गेले. यावेळी मराठा महासंघाशी त्यांचा संबंध आला आणि यातूनच त्यांनी सामाजिक कामाला सुरुवात केली. पहिल्या युती सरकारच्या काळात त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली. दरम्यानच्या काळात त्यांनी महाराष्ट्र लोकविकास पार्टी या पक्षाची स्थापना केली. मात्र, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर त्यांनी आपला पक्ष राष्ट्रवादीत विलीन केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे त्यांना उपाध्यक्ष पदासह दोन वेळा विधान परिषदेवरही संधी दिली. मागच्या लोकसभेच्या वेळी त्यांनी भाजपसोबत आघाडी केली. पक्षांतरामुळे त्यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर भाजपने त्यांना पुन्हा संधी दिल्याने त्यांनी विधान परिषदेची तिसरी टर्मही पुर्ण केली. आता चौथ्या वेळेस ते विधान परिषदेचे सदस्य आहेत.
मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांचे वय वाढविणे अशा विषयांसाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मराठवाडा लोकविकास मंचतर्फे राज्यात नाव कमावलेल्या मराठवाड्यातील नामांकीत व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्काराने गौरविले जाते. यामध्ये दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे, दिवंगत गोविंदभाई श्रॉफ आदींचा गौरव करण्यात आला आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply