काल परवाचीच गोष्ट एकजण एका जुन्या मित्राशी नेहमीप्रमाणे गप्पा मारत असताना तो म्हणाला मला अमुक तमुक अँप वर फोटो टाकता येत नाही. काहीतरी शोधण्यासाठी त्याने त्याचा मोबाईल माझ्या हातात दिला , पण ते अँप मी ओपन करताच घाई घाई ने त्याने माझ्या हातून मोबाईल घेतला.
हे तुमच्याही बाबतीत किंवा घरात घडले असेल, अगदी नवरा बायको ह्यांच्या बाबतीत देखील.. माझ्या फोन ला हात का लावला वगैरे.
मी तर माझा फोन कधीच लॉक करत नाही पासवर्ड ने.
साला आपली जिंदगी तो खुली किताब हैं.
बायको मात्र नेहमी ह्या न त्या कारणाने माझा फोन घेते, तिचा फोन मात्र लॉक असतो , मला तिने अनेक वेळेला तिचा पासवर्ड सांगितला पण तो मी विसरतो म्हणा लक्षात ठेवायची गरज भासत नाही.
ती मात्र माझ्या फोन मधला डी पी वगैरे बघून ही कोण , ती कोण विचारात असते , मी खरे उत्तर नेहमीच ? देतो.
परंतु काही घरात मात्र अनेकजण आपापला मोबाईल सोडायला तयार नसतात, अंघोळ, संडास तेथे पण नेतात. मग संशयाला जागा काय ” थ्री बी एच के ” चा फ्लॅट होतो म्हणजे संशयाला खूप जागा होते.
त्यातून ” तू तुझ, मी माझं ” संस्कृती निर्माण झाली.
पण अशा लोकांची सॉलिड गंमत आणि कधी कधी कीव वाटते. सतत एका अदृश्य भीतीच्या सावली खाली ही मंडळी जगत असतात.
मग एकमेकांना पिडणे, ब्लॉक करणे सुरू होते.
खरे तर मोबाईल हे संपर्काचे साधन समजले जाते मग त्याचा प्रवास ‘ अति परिचयात ‘ होऊन ‘ ब्लॉक ‘ करणे होते. म्हणजे संभाषण बंद.
मग काहीजण जेवलीस का…वगेरे चालू होते तेथे पुढे पण ब्लॉक लागतो…मी लिहिलेले ती किंवा तो वाचत नाही म्हणून . वगैरे.
सुरवातीला ‘ खाजगी ‘ म्हणलो होतो….कधी कधी ते अधिक ‘ खाज गी ‘ होऊन त्यातून संघर्ष होतो.
एक वस्तू जी पूर्वी नव्हती ती आता आहे..
अहो जग जवळ आणले तिने…
माणसेही जवळ आणली…
मनेही जवळ आणली असतील…
पण ‘ खाजगी ‘ शब्द मात्र सुपरिचित झाला , मित्र लपवून ठेवू लागले जे पूर्वी आपले विचार सुरवातीला एखादी साधी शिवी देऊन व्यक्त होत होते…
तो व्यक्त पणा कमी होऊ लागला
त्या छोट्याश्या डबी मुळे.
काय खरे ना …..?
सतीश चाफेकर
Leave a Reply