नवीन लेखन...

‘मोबाइल टॉवर’ चे दुष्परिणाम 

मोबाइल फोन आपल्याला सर्वात जवळचा झालेला आहे, म्हणून त्याच्यापासून फार नुकसान व्हायला हवे का? परंतु जास्त त्रास तर टॉवरपासून आहे. कारण मोबाइलचा वापर आपण एकसारखा करत नाही, परंतु टॉवर मात्र अहोरात्र रेडिएशन पसरवत असतात, प्राणीमात्रावर त्याचे दुष्परिणाम होत असतात.

रेडिएशन कसे कमी कराल ?

१) रेडिएशन कमी करण्याकरिता आपल्या फोनला (फॅराईड बीड) रेडिएशन शोधून घेणारे एक यंत्रसुद्धा लावू शकता.

२) मोबाइल फोनसाठी रेडिएशन शील्डचा वापर करणे हा एक उत्तम पर्याय आहे. आजकाल काही कंपन्या अशा प्रकारचे उपकरण विकत आहेत.

३) रेडिएशन ब्लॉक अॅप्लिकेशनचा वापरही करू शकता. खरे तर हे एक खास तऱ्हेचे सॉफ्टवेअरच आहे की जे एक ठराविक वेळेपर्यंत वाईफाई, ब्ल्यू-टूथ, जीपीएस किंवा अँटिना ब्लॉक करू शकते.

सरकारने नव्या धोरणानुसार देशामध्ये सर्वत्र प्रत्येकास मोबाइल वाटण्याची योजना आखली आहे. परंतु मोबाइल फोन आणि टॉवरपासून निघणारे रेडिएशन प्रकृती स्वास्थ्याच्या दृष्टीने किती धोकादायक आहे, याची कल्पना सामान्य जनतेला नाही. आज शहरात ‘अनेक या घरांच्या छतावर मोबाइल टॉवर बसवलेला आहे. मोबाइल रेडिएशनमुळे अनेक व्याधींना जन्म दिला जात आहे. यात प्रामुख्याने डोकेदुखी, मस्तकात झिणझिण्या, सारखा थकवा येणे, चक्कर येणे, तणाव, झोप न लागणे, डोळ्यात कोरडेपणा, कामात लक्ष न लागणे, कानामधून आवाज येणे, कमी ऐकू येणे, स्मरणशक्ती कमी होणे, अपचनाचा त्रास, छातीमध्ये धडधडणे, सांधेदुखी इत्यादी. अभ्यासाच्या निष्कर्षानुसार मोबाइल रेडिएशनमुळे दीर्घ काळानंतर प्रजनन क्षमता कमी, कॅन्सर, मेंदूत गाठ आणि गर्भपात होण्याच्या शंका व्यक्त होत आहेत. तसे पाहिले तर आपल्या शरीरात ७०% पाणी आहे. मस्तकात देखील ९०% पर्यंत पाणी असते. हे पाणी हळूहळू बॉडी रेडिएशन शोषून घेते आणि यामुळे बरेच नुकसान होते. गेल्या वर्षीच्या आय डब्लू एच ओच्या रिपोर्टानुसार मोबाइलमुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे, असा सर्वसाधारण निष्कर्ष निघाला आहे.

इंटर फोन अभ्यास अहवालानुसार असे अनुमान निघाले आहे की, रोज अर्धा तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ मोबाइलचा वापर केला गेला तर ८-१० वर्षात मेंदूत गाठ होण्याचा धोका -२००-४०० % वाढला आहे.

रेडिएशन म्हणजे काय ?

इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्ज मुळे माइक्रोवेव रेडिएशन निर्माण होते. त्याची फ्रिक्वेंसी १००० पासून ३००० मेगाहर्टजपर्यंत एवढी असते. मायक्रोवेव ओव्हन, एसी, वायरलेस कॉम्प्युटर, कार्डलेस फोन आणि दुसरे वायरलेस डिवाइससुद्धा रेडिएशन निर्माण करतात. परंतु अवाजवी वापर, शरीरापाशीच आणि मोठ्या संख्येने वापर यामुळे मोबाइल रेडिएशन सर्वात खतरनाक समजले जात आहे. मोबाइल रेडिएशन दोन प्रकारचे आहेत. ते म्हणजे मोबाइल टॉवर आणि मोबाइल फोन, न्युरोलॉजिस्ट डॉ. पुनीत अग्रवाल यांच्या पाहणीनुसार मोबाइल रेडिएशन सर्वांकरिता नुकसानकारक आहे. परंतु लहान मुले, स्त्रिया, वृद्ध आणि आजारी लोकांना अधिकच नुकसानकारक होऊ शकते. अमेरिकेच्या फूड अॅन्ड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार लहानांनी आणि किशोरवयीनांनी फार वेळ मोबाइल हाताळू नये, त्याचा जादा वापर टाळावा आणि स्पीकर फोन किंवा हँडसेटचा वापर करावा. कारण त्यामुळे मस्तक आणि मोबाइल यांच्यात अंतर राहील.

टॉवरचे रेडिएशन

घरासमोर टॉवर बसवलेला असेल तर त्या घरात राहणाऱ्या लोकांच्या प्रकृतीच्या समस्या दोन तीन वर्षातच सुरू होण्याची शक्यता असते. मोबाइल टॉवरच्या ३०० मीटर परिसरात सर्वाधिक रेडिएशन असते.

अँटिनाच्या समोरच्या भागात सर्वात जास्त लहरी निघतात. म्हणजे समोरून होणारे नुकसान फारच आहे, ते पाठीमागून आणि खालून होण्यापेक्षा, टॉवरच्या अँटिनासमोर घर आहे, का पाठीमागे यावरून मोबाइल टॉवर कसे नुकसानकारक आहे ते ठरविले जाते. टॉवरच्या एक मिटर परिसरात १०० पट अधिक रेडिएशन असते. टॉवरवर जितके जास्त अँटिना असतील, तेवढे रेडिएशन अधिक असते. दिवसभरात २४ मिनिटे मोबाइल फोनचा वापर स्वास्थ्याच्या दृष्टीने योग्य आहे. इथे हेसुद्धा पाहायला हवे की आपल्या मोबाइलची एस आर व्हॅल्यू काय आहे? ज्यादा एस ए आर व्हॅल्यूच्या फोनवर कमी वेळ बोलणे, कमी एस ए आर व्हॅल्यूवाल्या फोनवर जादा बोलण्यापेक्षा जास्तच नुकसानकारक आहे. फार वेळ फोनवर संभाषण करायचे असेल तर लँडलाईन फोनचा वापर अधिक चांगला ठरतो. म्हणून ऑफिस किंवा घरात कॉर्डलेस. फोनचा वापर टाळून लँडलाईनचा वापर करावा.

रेडिएशनपासून बचाव

मोबाइल रेडिएशनपासून बचाव होण्याकरिता करण्यासारखे उपाय आहेत.

– मोबाइल टॉवरपासून जेवढे दूर राहता येईल तेवढे दूर राहावे.

– टॉवर कंपनीकडून अँटिनाची पॉवर कमी करून घ्यावी.

– घरात रेडिएशन डिटेक्टरच्या मदतीने रेडिएशनची पातळी तपासून घ्या. ज्या भागात रेडिएशन अति प्रमाणात आहे त्या भागात जाण्याचे शक्यतो टाळा.

– dete नावाचे रेडिएशन डिटेक्टर जवळ जवळ ५००० रुपयात मिळते.

– घर आणि खिडक्यांवर खास प्रकारच्या फिल्म लावू शकता कारण काचेमुळे सर्वात जास्त रेडिएशनचा धोका उत्पन्न होतो.

-अँन्टी-रेडिएशनच्या फिल्मची किंमत एका खिडकीकरिता जवळजवळ चार हजार रुपये आहे.

– खिडक्या दरवाजे यावर शिल्डिंग पडदे लावू शकता. हे पडदे काही मर्यादेपर्यत रेडिएशन थोपवू शकतात. काही कंपन्या अशा पडद्यांची निर्मिती करत आहेत.

सिग्नल कमी असेल तर तोही घातकच

जर सिग्नल कमी येत असेल तर मोबाइलचा वापर करू नका. अशा वेळी रेडिएशन अधिक वाढते. पूर्ण सिग्नल मिळाला तरच मोबाइलचा वापर करा. मोबाइलचा वापर खिडकी किंवा दरवाज्याच्या जवळ उभे राहून मोकळ्या जागेत करावा, हे फारच चांगले होईल. कारण यापासून निघणाऱ्या लहरींना बाहेर जाण्यास वाव मिळेल. आपल्या शरीरापासून मोबाइल जेवढा दूर असेल तेवढे नुकसान कमी होईल म्हणून फोन आपल्यापासून दूर ठेवा. ब्लॅकबेरी फोनमध्ये एक संदेशही येतो. तो संदेश असा आहे की मोबाइल आपल्या शरीरापासून २५ मिमी (१ इंच) एवढ्या तरी दूर ठेवा.

सॅमसंग गॅलक्सी एस ३ मध्ये मोबाइल शरीरापासून दूर ठेवा, असा संदेश येतो. ईएनटी स्पेशालिस्ट यांच्या म्हणण्यानुसार इलेक्ट्रॉमॅग्नेटिक रेडिएशनपासून बचाव करण्याकरिता स्पीकर फोन किंवा या हँडस-फ्रीचा वापर करा. ज्यामध्ये ईयर पीस आणि कानाच्या मध्ये प्लॅस्टिकची एअर ट्यूब आहे असे हँन्डसेट वापरा.

तो कमीत कमी दोन फूट तरी लांब ठेवलेला असावा. मोबाइल रेडिएशनमुळे हृदयाचा आजार बळावतो असे नेमके सांगता येणार नाही, परंतु मोबाइलचा अतिरिक्त वापर किंवा मोबाइल टॉवरच्या जवळ राहणे यामुळे इतर समस्यांबरोबर हृदयाची धडधड अनियमित होते, अशी शंका येणे रास्तच आहे. सांगण्याचे एवढेच की आपण सावधगिरीने राहू आणि मोबाइलचा वापर कमी करू.

शरीराला पेसमेकर लावलेला असेल तर हँडसेटपासून एक फूट अंतरावरून संभाषण करा. कारण शरीरात हे उपकरण डिवाइस इलेक्ट्रिक सिग्नल तयार करते. त्यामुळे त्याचबरोबर मोबाइलच्या सिग्नलची दखल घेतली जाते. त्यामुळे शरीराला कमी किंवा जास्त सिग्नल मिळतात, की जे नुकसानकारक असतात.

अशा वेळी ब्ल्यू टूथ किंवा हँड्स-फ्री डिवाइसच्या सहाय्याने किंवा स्पीकर मोठा करून संभाषण करा. जेथे पेसमेकर लावला आहे, तेथील खिशात मोबाइल ठेवू नये.

सुप्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ. प्रकाश कोठारींच्या म्हणण्यानुसार मोबाइल रेडिएशनमुळे नुकसान होते किंवा नाही याबद्दल ठोस असे काही सांगता येणार नाही.

परंतु सर्व धोका लक्षात घेऊन, एकंदरीत विचार करून प्रत्येकाने सावध राहावे आणि आपले मोबाइल कमरेवर बेल्टच्यावर लावले तर फारच चांगले.

भारतामधील एसएआरचे नियम

सद्य परिस्थितीत हँडसेटमध्ये जे. रेडिएशन आहेत त्याचे युरोपियन नियमानुसार पालन होते आहे. या नियमानुसार हँडसेटचा एसएआर लेव्हल २ वॅट प्रति किलोपेक्षा बिलकुल जास्त व्हायला नको. परंतु एक्सपर्ट या नियमांना न्याय्य मानत नाहीत.

या पाठीमागचे कारण असे आहे की, हे नियम भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशास उपयुक्त होणार नाहीत.

या कारणामुळे आपणावर रेडिओ फ्रिक्वेन्सीचा मोठ्या प्रमाणावर घातक परिणाम होऊ शकेल.

रेडिएशनमुळे कोणते दुष्परिणाम होतात ?

१. २०१२ मध्ये डब्ल्यूएचओच्या एका संशोधनानुसार असा खुलासा करण्यात आला आहे की मोबाइल रेडिएशनमुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.

२. हंगेरीमध्ये शास्त्रज्ञांचे असे निष्कर्ष आले आहेत की, युवक फार काळ सेल फोनचा वापर करतात.

३. जर्मनीच्या संशोधनानुसार जे लोक ट्रांसमीटर अँटिनाच्या ४०० मीटर परिसरात राहात होते, त्यांच्यात कॅन्सर होण्याची संभाव्यता तीन पटीने वाढली.

४. केरळमधील एका संशोधनानुसार सेल फोन टॉवरमुळे होणाऱ्या रेडिएशनमुळे मधमाशांची कार्यक्षमता ६० टक्के कमी झालेली आहे.

५. सेल फोन टॉवरजवळ ज्या पक्ष्यांनी अंडे घातले पण तीस दिवसांनंतरही त्यातून पिले बाहेर आली नाहीत. ज्या गोष्टीला दहा ते चौदा दिवस लागतात पण ३० दिवस झाले तरी पिले अंड्यातून बाहेर आली नाहीत. टॉवरमधून इतकी फ्रिक्वंसी (९०० ते १८०० मे हॅट) च्या इलेक्ट्रो मॅग्नेटिक लहरी बाहेर पडतात पण त्या छोट्या छोट्या गोष्टींवर दुष्परिणाम करू शकतात.

६. २०१२ च्या सर्वेक्षणानुसार जास्त वेळ मोबाइलचा वापर झाला तर गाठ होण्याची शक्यता आहे.

‘तरुण भारत’ वरून.

जगन्नाथ कुलकर्णी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..