आज काल घर बसल्या मोबाईलवरनं हवं ते बुक करून मागवू शकतो.
मी चितळे मिठाईला फोन लावला ट्रींग ट्रींग.
चितळे मिठाई आपले स्वागत करत आहे. बोला काय हवंय?
काही तरी गोड मागवावं म्हणतो.
लाडू साठी एक दाबा ,
रसगुल्ला साठी दोन दाबा ,
गुलाबजामुन साठी तीन दाबा.
मी म्हणालो लाडू हवेत.
बूंदीच्या लाडू साठी एक दाबा ,
सुक्या मेव्याच्या लाडू साठी दोन दाबा.
खव्याच्या लाडू साठी तीन दाबा.
मी एक दाबलं बूंदीचे हवेत.
एक पावसाठी एक दाबा,
एक किलोसाठी दोन दाबा,
एक क्विंटलसाठी तीन दाबा.
चुकून तीन नंबरचं बटन दाबलं गेलं. मी घाबरून फोन कट केला. दुसरयाच क्षणी त्यांचा फोन आला.
आपल्याकडून एक क्विंटल लाडूची और्डर आली आहे. घराचा पत्ता द्या.
मी बोललो – मी तर फोनच नाही केला.
मग आपल्या भावाने केला असेल . ह्याच नंबर वरून कॉल आला होता. तुमच्या भावाला फोन द्या.
मी बोललो आम्ही सहा भावंडे आहोत.
मोठ्याशी बोलण्यासाठी एक दाबा,
मधल्याशी बोलण्यासाठी दोन दाबा
छोट्याशी बोलण्यासाठी तीन दाबा
त्याच्यापेक्षा लहानाशी बोलण्यासाठी चार दाबा
समोरच्याने फोनच कट केला.
Leave a Reply