नवीन लेखन...

आधुनिक नवीन शिक्षाशास्त्र

केलेल्या अपराधाच्या गांभिर्याप्रमाणे शिक्षा त्याच प्रमाणात व्हावी हा आधुनिक विचार आहे. गुन्हेगाराचे पुनर्वसन करण्याकरता त्याचे सुधारीकरण जास्त महत्वाचे आहे. त्याला समाजातून दूर करणे योग्य नाही. आजकाल गुन्हेगारांना जुन्या काळातील रानटी शिक्षा देणे बंद करण्याकडे कल आहे. दगडांनी ठेचून मारणे, जाळपोळ करणे, फाशी देणे, अवयव तोडणे, उपाशी ठेवून मारणे वगैरे अयोग्य असल्याचे मानले जाते. आधुनिक विचारांचा पाठपुरावा शिक्षाशास्त्रज्ञ श्रीयुत बेकारिया, गॅरोफेलो फेरी, तारडे, बेंथाम यांनी केला. त्यामुळे आरोपीला कडक शिक्षा न देता त्याला सुधारणे आणि समाजात चांगला नागरिक तयार करणे या विचारांचा प्रचार केला.

दंड-नुकसानभरपाई, तडीपार करणे, तुरुंगात काही काळ अलग एकांतवासपणा देणे वगैरे सुधारणा करण्यावर भर देण्यात आला आहे. मध्ययुगीन काळात तर फारच रानटी शिक्षा दिल्या जात असत. उदा: चोरीकरता हात तोडणे, खोटे बोलण्यावर जीभ तोडणे, बलात्काराकरता पुरुषाचे लिंग कापणे अगर इतर प्रकारे त्याचे पुरुषीकरण खच्ची करणे वगैरे शिक्षा दिल्या जात असत. आधुनिक जगातील नवीन विचार म्हणजे आरोपीला सुधारण्याकरता शिक्षेचा विचार व्हावा. फ्रन्स देशात सन 1787 मध्ये मानवाचे अधिकार जाहीर झाले आणि त्याबरोबरच जुन्या रानटी शिक्षा देणे याचा अंत झाला आणि शिक्षाशास्त्र हे नवीन विज्ञान सुरू झाले आणि आरोपीला कडक शिक्षा दिल्यास तो जास्त धोकादायक समाजाला होतो म्हणून सुधारणा करण्याकडे कल वाढू लागला आणि समाजात आरोपीला स्थान देऊन त्याचे पुनर्वसन करणे समाजाच्या हिताचे आहे हे तत्त्व मान्य होऊ लागले आहे. आता तर दीर्घ मुदतीच्या शिक्षा झालेल्या आरोपींना खुल्या तुरुंगात ठेऊन त्यांना उदरनिर्वाह करण्याची साधने आणि संधी देण्यात येत आहे. श्रीयुत बॅकेरिया यांनी आवाज उठवून जुन्या रानटी शिक्षेविरुद्ध मतप्रदर्शन करून सर्व गुन्हेगारांना समान अपराध असल्यासारखी शिक्षा द्यावी असे सूचित केले आहे. आरोपीची व्यक्तिगत माहिती विचारात न घेता त्याचे पूर्वचरित्र, कौटुंबिक परिस्थिती यांची पाहणी करून शिक्षा देणे योग्य ठरेल असे स्पष्ट मत मांडले आहे.

नवीन आधुनिक विचार :

अपराध रोखणे, प्रतिबंध करणे आणि समाजाचे संरक्षण करणे हेच मुख्य उद्देश शिक्षा देण्यामागे असावेत. एकूण विचार करता निश्चितपणे कोणती पद्धती योग्य आहे हे सांगणे कठीण आहे. यावर न्यायमूर्ती श्रीयुत काएडवेल म्हणतात ‘गुन्हेगारास शिक्षा देणे ही एक कला आहे. सर्व गोष्टीचा विचार करून समतोलपणे तराजूप्रमाणे चारही प्रकारच्या शिक्षांचा विचार करून निर्णय द्यावा.’

डॉ. पी. के. जैन भारतीय शिक्षा शास्रज्ञ : भारतीय शिक्षाशास्त्रावर तज्ज्ञ व्यक्ती असून, त्यांनी भारताच्या जुन्या आणि नवीन शिक्षा पद्धतीवर भाष्य केले आहे. सरकार शिक्षेचा विचार करून त्यावर न्यायदानाचा विचार करत असते. त्यांच्या मते शिक्षा निश्चितपणे कल्पना देत नाही. कारण मानवी स्वभाव-वर्तन बदलत असते. हा बदल परिस्थितीनुसार होत असतो. त्याकरता पूर्वनिर्णयावर (Case Law) आधारित असा निर्णय घ्यावा. त्यांचे मताप्रमाणे अगदी प्राचीन भारतामध्ये मनू आणि कौटिल्याचे काळात राजाला राजधर्म माहीत असणे आवश्यक असते. कारण कर्म आणि दंड यांची सांगड घालून शिक्षा आवश्यकच असते. वरवर गुन्हे घडत असता त्यावर नियंत्रण आवश्यक असते; कारण सर्व शिक्षापद्धतींचा उद्देश एकच असतो. तो समाजाचे अपराधांपासून आणि गुन्हेगारांपासून संरक्षण करणे होय. यामुळे शिक्षा करणे म्हणजे समाजाचा बचाव होता, तर आता नवीन विचार आरोपीला सुधारणे आणि समाजात चांगला नागरिक कसा बनेल हा आहे.

— अॅड. प. रा. चांदे
नाशिक ४२२००९

— “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..