इ. ११वी, १२वी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, भूगोल, कृषीविज्ञान आणि तंत्रज्ञान (phy, che, bio, maths, geography, agricultural science and technology) या प्रमुख विषयांसह सुमारे ६५ विषय इंग्रजीतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही, त्यांची इच्छा असेल तर या विषयांची १२ वीची परीक्षा मराठीतून देण्याची सुविधा महाराष्ट्र शासनाने उपलब्ध केली आहे.
जे विद्यार्थी ११ वी १२ वी विज्ञान शाखेत इंग्लिशमधून वरील विविध विषय शिकतात त्यांच्यासाठी एक फायद्याची युक्ति आहे !
त्यांनी १२ वीचा परीक्षा अर्ज भरताना या विषयांच्या पुढे उत्तराची भाषा मराठी असा उल्लेख ०२ हा संकेतांक निवडून करावा. त्यांना परीक्षेच्या दिवशी त्यांच्या बाकावर वरील विषयांची मराठी प्रश्नपत्रिका मिळेल. या विषयांच्या मराठी प्रश्नपत्रिकेत त्या त्या विषयातील जे शास्त्रीय / तांत्रिक मराठी शब्द (शास्त्रीय / तांत्रिक संज्ञा) असतात त्यांच्यासोबत कंसात त्या शब्दांचे इंग्लिश प्रतिशब्द असतात.
याबाबतचे एचएससी बोर्ड परिपत्रक महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयात पोहोचलेले आहे. शिक्षण खात्याच्या या तत्परतेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे !
१२ वी विज्ञान शाखेतील सर्वच विद्यार्थ्यांना ानेक विषय त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीतून शिकवत असले तरीही त्यांना मराठीतून उत्तरे लिहिणे सहज शक्य व्हावे म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने ( एचएससी बोर्ड) अशा विद्यार्थ्यांचा विचार करून वरील विषयांच्या मराठी प्रश्नपत्रिकेत शास्त्रीय / तांत्रिक मराठी शब्दांच्या पुढे / शेजारी त्या मराठी शब्दांचा इंग्रजी प्रतिशब्द कंसात देण्याचे धोरण जोपासले आहे.
उत्तरे लिहितानाही म्हणजे उत्तारांतील मराठी वाक्ये लिहिताना जर विद्यार्थ्यांना एखादी मराठी शास्त्रीय / तांत्रिक संज्ञा किंवा मराठी शब्द त्याक्षणी आठवली नाही तर विद्यार्थी मराठी वाक्यात इंग्रजी तांत्रिक संज्ञा लिहू शकतील.
ज्यांना मराठी लिहिता वाचता येते अशा कोणत्याही विद्यार्थ्याला आता शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीतून शिकण्याची प्रथा असली तरी लेखी परीक्षेतील उत्तर पत्रिका मराठीतून लिहिण्याचा हक्क मिळाला आहे.
मराठीतील प्रश्नातील खोच, पेच, मर्म, तिढा, फिरकी मराठी भाषक विद्यार्थ्याला लवकर जाणवते व त्या प्रश्नाचे अधिक अचूक व अधिक सविस्तर उत्तर लिहून अधिक गुण मिळू शकतात.
११ वी १२ वीच्या वर्गात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, भूगोल, कृषीविज्ञान आणि तंत्रज्ञान (phy, che, bio, maths, geography, agricultural science and technology) हे विषय इंग्लिश भाषेतून शिकवले जातात म्हणून परीक्षाही इंग्लिश भाषेतूनच देण्याची प्रथा महाराष्ट्रात अनेक वर्षे होती.
या जुनाट, कालबाह्य प्रथेमुळे १२वीच्या परिक्षेत अनेकांना जीव तोडून अभ्यास केला असूनही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, भूगोल, कृषीविज्ञान आणि तंत्रज्ञान (phy, che, bio, maths, geography, agricultural science and technology) या विषयांत अपेक्षेहून कमी गुण मिळतात. ही परिस्थिती टाळून अधिक अधिक गुण मिळविण्यासाठी। . . . . .
” शिका इंग्रजीतून पण परीक्षा मराठीतून ” हे आधुनिक, प्रगत आणि नवे धोरण स्वीकारणे ही काळाची गरज आहे !
१२ वी विज्ञान शाखेतील प्रत्येकाने या आधुनिक व प्रगत धोरणाचा लाभ घ्यावा म्हणून बारावीतील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा लेख पोचविण्यासाठी हा लेख वाचणाऱ्या प्रत्येकाने शक्य ते सर्व प्रयत्न करावेत ही माझी खास विनंती आहे
महाराष्ट्रातील लाखो मराठी विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त ठरू शकेल अशी ही आधुनिक आणि प्रगत सुविधा उपलब्ध केल्याबद्दल . . . . . .
‘ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे (HSC board)
अभिनंदन आणि आभार !
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
— अनिल गोरे, मराठीकाका
९४२२००१६७१
marathikaka@gmail.com
Leave a Reply