श्री गणेश दर्शनाच्या निमित्ताने अनेकांच्या घरी जाण्याचा योग आला. काही घरांमधे आरती सुद्धा सुरु होती …
ही सर्व घरे अशी आहेत, जिथे मी 20 किंवा जास्त वर्षांपासून संबंधित आहे …
१५ – २० वर्षांपूर्वी च्या काळातील आरती मधे बाळ गोपाळांचा सहभाग .. प्रसादाची धमाल वगैरे आठवली …
आणि आता बाळगोपाळांपेक्षा वयस्कर जास्त दिसतात … प्रसाद संपत नाही …
मुले परदेशी शिकायला … नोकरी साठी आहेत …
किंवा कामावर आहेत .. सुट्टी होती पण काम राहिले होते …
२८ / २९ वय झाले आता लग्नाचे पहायला सुरुवात केली आहे ….
३५ वय झाले पण मुल जन्माला घालण्याची तयारी नाही …
…….. अशा कहाण्या घरोघरी दिसतात आहेत ….
याचे परिणाम समाज नष्ट होण्यात होणार आहेत ….
सध्याच्या तरूण असणाऱ्या आणि ३५ मधे मुले जन्माला घालणाऱ्या पिढीला नातवंडांचे तोंड त्यांच्या ७० आधी दिसण्याची शक्यता कमी …
Autism चे प्रमाण जे नगण्य होते ते आज २ टक्क्यांवर गेले आहे …
समाज एक रुक्ष वाळवंट होऊ घातलंय ……
चुकीच्या प्राथमिकता शिकविणारे आधुनिक शिक्षण – तारक की मारक …???
— मिलिंद कोतवाल
Milind Kotwal
Leave a Reply