आपले सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी जी कठोर पावले उचलली आहेत त्याची तारीफ करावी तेवढी कमीच आहे..देशातील सामान्य जनतेला नोटा रद्द केल्याचा त्रास जरूर होतोय तरीदेखील सामान्य जनता मोदींच्या बाजूने ठाम उभी असल्याचं चित्र आहे..आणि जनतेचं असं मोदींच्या बाजूने ठाम उभं असल्याचं एकमेंव कारण म्हणजे मोदी करतायत ते देशासाठी, आपल्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी चांगलंच आहे हा मोदींविषयी जनतेचा असलेला विश्वास. फक्त नेहेमीप्रमाणे मिडीयाला तेवढं यात काहीतरी वेगळं दिलतंय..
मोदीजी दोन वर्षांपूर्वी देशाचे पंतप्रधान झाल्यावर मी एक छोटा लेख लिहिला होता तो आपल्यासाठी पुन्हा पोस्ट करतोय..मोदीजी आज जे करतायत ते तेंव्हाच त्यांच्या नांवातून शोधण्याचा मी प्रयत्न केला होता..
‘मोदी’ म्हणजे कोण?
नांवात काय आहे असे शेक्सपिअर जरी म्हणाला असला तरी नांवात बरेच काही असते यावर माझा विश्वास आहे. अनेक नांवं व आडनांवांच मुळ शोधताना
बऱ्याचदा अतिशय मनोवेधक माहिती हाती लागते व नांवात बरेच काही असते हा माझा विश्वास अजून ठाम होतो.
या माझ्या सवयीनूसार मी ‘मोदी’ या आडनांवाचा अर्थ काय, ते आले कुठून याचा शोध घेत होतो व माझ्या हाती फार मनोरंजक माहिती लागली व नांव किंवा आडनांवात अर्थ असतो हे मला पुन्हा एकदा जाणवले.
‘मोदी’ हे आडनांव ‘मुदाअी’ या अरबी शब्दापासून तयार झाले आहे व याचा अरबी अर्थ ‘विश्वस्त,खजीना सांभाळणारा, दिवाणजी किंवा कारभारी’ असा आहे. राजाच्या वतीने हेच ‘मुदाअी’ राज्याचा कारभार समर्थपणे हाकायचे. पुढे पुढे राजे-रजवाडे इतिहास जमा झाल्यावर ‘मुदाअी’नी धान्याचा व्यापार सुरू केला व धान्याचे व्यापारी, ते मुदाअी असा अर्थ या शब्दाला प्राप्त झाला. धान्य हा शब्द ‘धन’ शब्दाचा जन्मदाता आहे असं म्हटलं तर चुकू नये..
‘मोदीखाना’ अथवा ‘मुदपाकखाना’ या शब्दांचा जन्मही ‘मुदाअी’तच आहे. मोदीखाना म्हणजे सैन्यासाठी लागणा-या धान्याचे कोठार आणि मुदपाकखाना तर आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे..
‘मुदाअी’ हा अधिकारदर्शक शब्द पुढे ‘मोदी’ असा आडनांवाच्या रूपाने स्थीर झाला. आपल्या देशातील बहुसंख्य आडनांव ‘व्यवसाया’ वरूनच आलेली आहेत. महाराष्ट्रातही मोदी, गांधी अशी आपल्याला गुजराथी वाटणारी आडनांवे सापडतात ती व्यवसायावरून आलेली आहेत.
‘मोदी’ या शब्दाचा अर्थ नरेंद्र मोदी सार्थ करून दाखवतील या विश्वासानेच तर आपण त्यांना निवडून दिलं आहे. नांवात बरंच काही असतं..!!
– नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply