मोह होता सहज मनाला
दोष मग कोणा द्यावा
सुकल्या काही फुलांचा
बाजार कुणी पहावा
मन व्यापले निर्मोही
वेडे भाव ते सारे
गुंतले धागे मोहाचे
बहर अबोल क्षणांचे
भावनेचा खेळ सारा
नकळत मन मोहून जाता
गहिवरले भाव अलगद
हळवे चांदणे मूक आता
मायेचा खेळ हा सारा
जीवन न कळते कधी केव्हा
मिटल्या पाकळ्या सुकून गेल्या
कोणी त्या न आल्हाद फुंकरिल्या
कळले नाही मन बावरे
शब्दांचा छल तो झाला
तुटले मन नकळत शब्दांनी
अस्तित्व पुसून टाक जरा
व्यवहारी दुनियेत या
मायेचा खोटा बाजार खुला
नकळत मिटले नयन ते
भाव मनात रडवून जाता
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply