मोहरणाऱ्या मनात मी
लाजून अलवार आहे
सांडले अत्तर गंधित
मी मोहक दरवळून आहे..
लाजला मोगरा अलगद
अंतरी गंध मिटून आहे
चांदण्याचा गजरा माळीला मी
चंद्र हसून मज पाहत आहे..
स्वप्नांतल्या कळ्यांची कविता
मी आल्हाद गुंफून आहे
सागराची गुज हलकेच मी
स्वातीचे मोती हृदयस्थ अबोल आहे..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply