भाळी ! असावे दान जीवाला
विवेकी ! संस्कारी सहवासाचे
जन्मदात्यांच्या , मंगल उदरी
प्राशावे अमृतघट सात्विकतेचे
जन्माजन्मातुनी जन्म मानवी
वैभवी सुखदा , दान संचिताचे
सत्कर्माची नित्य कांस धरावी
नीतिमूल्य ! जपावे मानवतेचे
हवेत कशाला ते दुष्ट हेवेदावे
रुजुदे , ऋणानुबंध वात्सल्याचे
जगणे केवळ बुडबुडा क्षणाचा
मिथ्याच जीवन ! सत्य युगाचे
लाभावी , गुरुकृपाच आगळी
शापित ! सरावे सारे जीवनाचे
तो अगम्य हरि एक सावरणारा
हे केवळ अटळ सत्य जीवनाचे
हृदयांतरी त्याचे स्मरण असावे
तत्व ! हेच अंतत: मुक्तीमोक्षाचे
— वि.ग.सातपुते.(भावकवी )
9766544908
रचना क्र.१५३.
१५ – १२ – २०१.
Leave a Reply