चंद्र कधी गोला असतो कधी कोर असतो,पोर्णिमेचा तर कधी आमावास्येचा असतो !चंद्र बीजेचा कधी चौदविका चाँद असतोनेहमीच सर्वांना हवा हवासा वाटतो !चंद्र कधी शास्त्रज्ञांचा आणि चांद्रविरांचा असतो,कवींचा तर कधी मनाचा कारक असतो !चंद्र कधी चांदण्यांचा आणि प्रेमीयुगलांचा असतोभाद्रपदातील विनायकी चतुर्थीला मात्र नकोसा वाटतो !
चंद्र नेहमीच वसुंधरेला आपली ताई मानत असतो,भाचा मात्र चंद्राला, खोटा मामा मानत असतो !चंद्र आताशा संकटात असतो कधी भाच्यांना भित असतो,भाचा त्याच्यावर अगणित अत्याचार करत असतो !
चंद्र आताशा चोरांचा असतो, कधी पाण्याने व्याकूळ असतो,चांदण्यांच्या साक्षीने कोरडी असवे ढाळत असतो,ताईला कलेकलेने विनवत असतो,वरूणबाबांना महिन्यातून एकदा भेटत असतो,वसुंधरेला मात्र चंद्र एकच असतो !
जगदीश पटवर्धन वझिरा बोरिवली (प.)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply