सध्या तर फळभाज्यांसह विविध गोष्टींचे रस भल्या पहाटे पिण्याची चढाओढच अनेक स्त्री-पुरुषांमध्ये दिसते. जॉगिंग ट्रॅक्सवर तर भल्यासकाळी त्या रसठेल्यांसमोर रांगा लागतात. कुणी दुधीचा रस रोज पितो, तर कुणी कढीपत्त्याचा, कुणी गव्हाचा तृणरस तर कुणी कारल्याचा, कोरफड, काकडी, गाजराचा किंवा कुणी या सगळ्याचा मिक्स रस रोज नियमित, न चुकता सेवन करतात. एकवेळ व्यायाम राहिला तर चालेल; पण हे रस अनेकजण पितातच.
खरंच असे रस रोज पिणं हे आरोग्यवर्धक असतं?
नियमित फिरायला जाणारे आणि नियमित ज्यूस / रस घेणारे असे अनेकजण कधी विचार करतात की, याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? त्यासाठी कधी डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे का? मी कोणता रस घेऊ? किती घेऊ? किती दिवस घेऊ? आणि घेऊ की नको? असं कुणी विचारतं का डॉक्टरांना? छे.छे.! असा सल्ला घेण्याची आपल्याला गरजच वाटत नाही, कारण सेल्फ मेडिकेशन करणा:यांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही. पण निदान त्याबद्दल वाचन, नेटवरून काही माहिती तरी घेतो का? तर नाही. ते औषधी आहे ना? मग सर्वाना चालते, असाच एक समज. पण ते औषधी आहे म्हणूनच प्रश्न आहे, कारण औषध म्हटलं की त्याला डोस म्हणजे मात्र / प्रमाण आले. कालावधी आला आणि मुख्य म्हणजे तुम्हाला याची गरज आहे का हे तपासणं आलं.
मधुमेह नसणा:यानं मधुमेहाचं औषध घेतलं तर चालेल का?
जेव्हा पहाटे आपल्याला रस विकत मिळतात, तेव्हा ते कधी काढले आहेत याची माहिती घेणं आवश्यक आहे. तसंच त्यांची साठवण करताना, वाटप करताना स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतली जात आहे का हे बघणंसुद्धा आवश्यक आहे. रस काढताना ती वनस्पती स्वच्छ धुवून, निवडून नंतर रस काढला जातो का? ते ही बघा. जर औषधांवर पेस्टिसाइडचे फवारे मारले जात असतील तर ते साध्या पाण्यानं धुवून निघत नाहीत. त्यांचे अंश रसातही येतात. म्हणून ही द्रव्यं कुठून आणली जातात त्याचीही माहिती घ्यावी. अनेक जण स्वत:च्या घरीच ज्यूस काढतात. आणि विचारतात, हे तर चालेल ना प्यालं तर? पण त्यांनीसुद्धा काळजी घेणं, सल्ला घेणं आवश्यकच आहे. आपण जे काही खाणार आहोत त्याची पूर्णत: शास्त्रीय माहिती घेणं आवश्यक आहे. साधे कपडे खरेदीला गेल्यावरही आपण किती चौकसपणो खरेदी करतो? आणि सेवीय पदार्थाबाबत मात्र फारच उदासीन असतो. म्हणूनच आधी सारासार विचार करा, तो महत्त्वाचा!
कुठल्याही प्रकारचे रस पिताना ऋतू, वय, प्रकृती, आजार, वनस्पतीचे गुणधर्म या सर्व गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. आणि तुमच्या डॉक्टरांनी/वैद्यांनी सुचवलं असेल, सांगितलं असेल तर त्यांच्या सल्ल्यानुसारच हे रस घेणं योग्य. स्वत:च्या मनानं, आपल्याला वाटतं म्हणून किंवा सगळे पितात म्हणून हे रस पिऊ नका.
आयुव्रेदामध्ये रसचिकित्सा सांगितली आहे. याचे दोन अर्थ होतात.
1) रस – स्वरस, एखाद्या वनस्पतीचा अंगचा रस.
2) रस+षड्रस- चव जिभेलाच ‘रसना’ असे म्हणतात.
कारण यामुळे चवीचं ज्ञान होतं. या चवी सहा प्रकारच्या असतात. गोड, आंबट, खारट, तुरट, कडू आणि तिखट. या प्रत्येक चवीचे शरीरावर परिणाम होत असतात. या चवीसुद्धा ठरावीक प्रमाणात घेणं आवश्यक असतं. हे प्रमाण कमी-जास्त झाल्यास आजार होतात.
उदा. गोड चव ही फक्त मधुमेहींनाच वज्र्य नाही तर ज्यांचं वजन वाढते आहे, ज्यांना सर्दी-खोकल्यासारखे कफाचे आजार सतत होतात त्यांनीसुद्धा गोड जास्त खाऊ नये. याचप्रमाणो कडू चव जरी आवश्यक असली तरी त्याचं प्रमाण अत्यल्प असावं, अधिक प्रमाणात घेतल्यास शरीरात रुक्षता वाढते. सतत तहान लागणं, त्वचा कोरडी होणं, हे त्यातूनच घडतं. रोज कारल्याचा रस घेण्यानं त्या बाईंचं काय झालं, हे आता तुम्हालाही समजलं असेल! औषध ही दुधारी तलवार आहे. स्वत:च्या मनानं औषधं घेऊन स्वत:वर प्रयोग करणं, स्वत:ला ‘गिनिपिग’ बनवणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे औषधींचा / वनस्पतींचा रस वापरून चिकित्सा करणं. यात ज्या वनस्पतींमध्ये भरपूर रस असतो, प्रामुख्यानं त्यांचा रस वापरला जातो. विविध स्वरूपात औषधं वापरली जातात. उदा. चूर्ण, काढा, गोळ्या यापैकी एक म्हणजे रस. ज्या वनस्पतींमध्ये दृवांश कमी असतो त्यात थोडं पाणी टाकून, कुटून हा रस काढला जातो. यास अग्निसंस्कार नसतो यामुळे रस टिकाऊ नसतात. 2-3 तासांपेक्षा अधिक टिकत ते टिकत नाहीत. ते फसफसतात. आंबट होतात. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, रक्तदाब कमी करण्यासाठी हृदयाला बल्य म्हणून दुधी भोपळा रस उपयोगी आहे. पण तुम्ही रोज घेत असाल तर त्यावर किटकनाशकं फवारणी किती प्रमाणात आहे याची माहिती घ्या. रक्तवाढीसाठी किंवा डोळ्यासाठी अनेक जण गाजर, बीट दुर्वाचा असे रस घेतात. गाजर रस स्वरूपात किंवा त्यासह स्निग्ध पदार्थ तेल, तूप इत्यादि असल्यासच शरीरात शोषला जातो. सलाड म्हणून गाजर कच्चं खाल्यास शरीरास काहीही मिळत नाही. त्याऐवजी तेलाची फोडणी असलेली कोशिंबीर किंवा गाजर हलवा खाणं योग्य. त्याचप्रमाणं गाजर रसही सतत घेत राहिल्यास शरीरातील केरॅटिन वाढते. त्वचा तांबूस होते. बीट रससुद्धा रोज घेऊ नये. मधूनमधून खंड करावा. गाजर-बीट एकत्र घेतल्यास 1/4 भाग बीट व 3/4 भाग गाजर रस असं प्रमाण ठेवावं. कोरफड रस नियमित घेणा:या व्यक्तीही आहेत. त्याचा ब्रँडेंड रसही आता बाजारात मिळतो. कोरफडीचं कार्य मुख्यत: यकृत, गर्भाशय यावर होतं. सतत कोरफड रस घेण्यानं मूळव्याध होण्याची शक्यता असते. तसेच गर्भिणी, पाळीच्या वेळी अति रक्तस्त्रव होणा:या स्त्रिया, यांनी हा कोरफड रस घेऊ नये.
— संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. वैद्य रजनी गोखले
Leave a Reply