मित्रांनो प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी डोंगरावर चढावे , शिखर सर करावे. ह्यात जो काही आनंद मिळतो तो इतका मोठा असतो की , जणूकाही आपल्याला खूप मोठं बक्षिसच मिळालंय असं वाटू लागतं. डोंगर , दऱ्या , शिखरं इथे आपल्याला निसर्गाचं अवर्णनीय रूपाचं दर्शन होत असतं. त्यामुळे आपल्या शरीरात उत्साह संचारतो. एक वेगळा दृष्टिकोन प्राप्त होतो. आयुष्यातली सकारात्मकता वाढते.
मित्रांनो तुम्हांला ऐकताना नवल वाटेल की , परदेशात १ ऑगस्ट हा National Mountain Climbing Day म्हणून साजरा केला जातो. ह्या मागचा इतिहासही काहीसा गमतीदार आहे. असं म्हटलं जातं की , बॉबी मॅथ्यूज आणि त्याचा मित्र जोश मॅडीगन ह्यांनी न्यू यु स्टेटच्या अॕडिरोंडॅक पर्वताच्या ४६ उच्च शिखरं यशस्वीरित्या चढल्याबद्दल व त्यांच्या सन्मानासाठी हा दिवस साजरा केला जाऊ लागला. हे दोन तरुण दिनांक १ ऑगस्ट २०१५ रोजी ४६ व्या , व्हाईटफेस माउंटनवर चढले. मे २०१६ रोजी ह्यांना औपचारिकरित्या अॕडिरोंडॕक 46er club मध्ये सामील केले गेले.
मित्रांनो हेच वय आहे , ह्याच वयात पर्वत , डोंगर , शिखर सर करू शकतो. चला तर मग ह्याच दिवसाचं औचित्य साधून एक ट्रेकिंग प्लॅन लवकरात लवकर आखूयात.
— आदित्य दि. संभूस
Leave a Reply