नवीन लेखन...

मुडदा (कथा)

आपल्यापैकीच एक जण मरण पावला. तो कसा मरण पावला हे बघवत नाही. मग कुणीतरी सहन न होऊन चादर पांघरतो. जिवंतपणी बिचाऱ्याला पांघरायला काही नव्हत. थंडी-जी काय थोडीफार वाजते तिच्यामुळे अर्धमेला झाला. गेल्यावरती पांघरुण मिळालं बिचाऱ्याला. मग त्या प्रेतावर डोळा ठेवून, त्यावर मयतासाठी पडणाऱ्या पैशांवर नजर ठेवून बसणारे महाभागही असतात. त्यांना दोष देण्यात तरी काय अर्थ ? त्यांनाही थंडी वाजतच असते.


मुंबईत दिवसाला किती माणसं मरतात? बरीच मरत असावीत. कारण काही वेळा स्मशानात रांग लावून थांबाव लागतं. आजारी पडून वयोमानाप्रमाणे मरणारे जसे असतात. तसेच अपघातात मरणारेही बरेच असावेत. कारण कॉरोनेर कोर्टातही रोज वीस-पंचवीस केसेस चालू असतात. माणंस ताटकळत उभी असतात. रिपोर्ट लिहिले जातात. प्रेत ताब्यात दिली जातात.

रस्त्याच्या कडेला मरुन पडलेली बेवारशी प्रेतं आणि मुडदेसुध्दा दिसतात. आपल्यापैकीच एक जण मरण पावला. तो कसा मरण पावला हे बघवत नाही. मग कुणीतरी सहन न होऊन चादर पांघरतो. जिवंतपणी बिचाऱ्याला पांघरयला काही नव्हतं. थंडी- जी काय थोडीफार वाजते तिच्यामुळे अर्धमेला झाला. गेल्यावरती पांघरुण मिळालं बिचाऱ्याला. मग त्या प्रेतावर डोळा ठेवून, त्यावर मयतासाठी  पडणाऱ्या पैशांवर नजर ठेवून बसणारे महाभागही असतात. त्याना दोष देण्यात तरी काय अर्थ? त्यांनाही थंडी वाजतच असते.

त्यामुळे शहरात कुठेना कुठे तरी मुडदे पडलेले आपण पाहत असतो. फारसं काही वाटेनास झालेल असतं. आपल्या सदसद्विवेक बुध्दीला ज्याचा ज्याचा म्हणून त्रास होतो. त्या सगळयाच गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची विलक्षण हातोटी या महानगरामध्ये आपल्यात निर्माण झालेली असते. त्याशिवाय टिकाव लागणंही अशक्यच असते.

पण परवा ज्या मुडद्याची हातोटी या महानगरामध्ये आपल्याला निर्माण झालेली असते. त्याशिवाय टिकाव लागणंही अशक्यच असतं.

पण परवा ज्या मुद्याची चर्चा माझ्यासमोर झाली, ती ऐकण्यासारखी होती. म्हणजे मुडद्यांचे प्रकार असतात. बरेच आपल्या डोळयासमोरच असतात. पण दिसत नाहीत.

माझा टेलिफोन कोमात गेला. खूप आदळआपट केली. बाहेरुन फोन करुन बघितला. 199 ला फोन करुन ऑपरेटरच्या तर्फे लागतो का प्रयत्न केला. त्यानंतर 198  वर तक्रार नोंदविली. पण आमचे फॅमिली  डॉक्टर-लाईनमन काही आले  नाहीत. कारण इतर अत्यावश्यक सेवा पुरवण्यात ते गर्क होते. बरं कोमात जायच कारणही काही कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे त्या भागातील टेलिफोन एक्स्जेंजवर जाऊन पोचलो.

तिथं इतक्या पाटया होत्या, इतकी नांव होती, इतके झोन्स होते की, त्यामधून नेमका कुणाला गाठावा हे कळणं जवळजवळ अशक्यप्रायच होतं. पण कसाबसा मार्ग काढत एका टेबलापर्यंत पोचलो. तिथं आमच्या लाईनमनचे बॉस बसतात असे समजल होते. पण खुर्ची रिकामी होती. भोवताली माझ्यासारखीच दहा-बारा आशाळभुतं उभी होती. बरं हे साहेब केव्हा येतील याचा काही भरवसा नव्हता. कोणी सांगणारं नव्हतं. विचारपूस करणार तरी कशी? शेजारी बसलेल्या साहेबाभेवती मधमाशांची इतकी झुंबड होती की त्यातून तो बर बघणार आणि आपण विचारणार तरी केव्हा आणि तो सांगणार तरी काय, असा विचार करत इतरांबरोबर एमटीएनएलला शिव्या देत टंगळमंगळ करत उभा राहिलो.

कोपऱ्यात एक पाटी पाहिली- जनसंपर्क अधिकारी. बाहेर फारशी गर्दी दिसली नाही. दरवाजा उघडून आत गेलो. साहेब फोनवर बोलण्यात गर्क होते. प्यूनने फटकारलं, स्लीप काढलीत? प्रश्न इतका अवचित आला की, मी गांगरुन गेलो. मला बहुतेक इंग्रजी समजत नसावं, असा त्यांचा ठाम समज झाला असावा.

बाहेर त्या बाई बसल्यात त्यांच्याकडून चिठ्ठी घेऊन या. पेपरचा एक गठ्ठा साहेबापुढे टेबलावर आपटत त्यांन सांगितले. बाईंच्या समोर भली मोठी रांग होती. मुंगीच्या पावलानं सरकणारी.इथं उभं राहून काय होणार, अस मनात आलं. पण म्हटल, नाही तरी आलोच आहोत, तर कुणाला तरी भेटून आपली तक्रार सांगितल्याच समाधान तरी मिळेल.

माझा नंबर आला. काय एवढं लिहून घेतात याबद्दल एक शाळेकरी कुतूहल मनात होतंच. अक्षर कोरीव हातें. अगदी मनापासून लिहीत होत्या. नाव काय. प्रतयेक शब्द त्या परत उच्चारुन मग लिहीत होत्या. पत्ता? वय? कुठे काम करता? टेलिफोन नंबर काय? ते लिहून घेतल, की शेजारच एक रजिस्टर घेऊन त्यावर परत  तीच माहिती त्या लिहून काढत होत्या. त्यानंतर त्या स्लीपबुकातला कार्बन काढून तो पुढच्या स्लीपच्या खाली व्यवस्थित ठेवून मग लोखंडी पट्टी घेऊन ती स्लीप फाडून परत एकदा वाचून मजकूर बरोबर आहे की नाही, याची खात्री करुन ती स्लीप आपल्या हातात देतील अस वाटावं, एवढयात परत ती खाली ठेवून रजिस्टरमधला अनुक्रमांक लिहून त्यावर छानसं वेटोळ काढून ती चिठ्ठी आपल्याकडे न बघता हातात देत होत्या. इतक्या वेळात उभ्या उभ्या मुडदा पडायचा.

साहेबांची केबिन, सपंर्क, दोन खुर्च्या, ज्याचं गा-हाण ऐकतात त्याच्या पुढचा नंबर त्याच्या शेजारी बसून शांतपणे ऐकतो. त्याची बोळवणी झाल्यावर, वाट बघणारा त्या खुर्चीत बसल्यावर मी रिकाम्या खुर्चीवर जाऊन बसतो.

साहेब मी माझं जुन घरं बदलून नवीन घरात राहायला गेलो.

बरं मग?

तसा मे मध्ये अर्ज केला. एक जून पासून टेलिफोन लाईन डिस्कनेक्ट करा म्हणून. त्यावेळी सांगितल- घर सोडताना टेलिफोनची मशीन नवीन घरी घेऊन जा.

टेलिफोनच्या इन्स्ट्रयुमेंटला हात का लावला? तो गुन्हा आहे. माहीत नाही?

माहिती आहे साहेब पण साहेबांनी सांगितले.

बरं मग?

अर्ज दिला आणि आता ज्या लाईनवर टेलिफोन नाही. त्याच दोन महिन्याच बिल आलंय पंचवीस हजार रुपये.

बरोबर आहे. तुम्ही नुसता टेलिफोन नेलात. म्हणजे मुडदा नेलात. पण लाईन जिवंतच होती. ती बंद झाली की नाही बघायला नको. कुणीही दुरुपयोग करु शकतो.

पण मी लिहून दिलं होतं.

लिहून उपयोग होत नाही. बिल भरा आणि अर्ज करा. मग बघा काय होतंय.

सर, पण इतके पैसे आणू कुठून?

मी काय सांगणार. नेक्स्ट.

माझ्या कोमात गेलेल्या टेलिफोनचा मुडदा होण्यापूर्वीच मी बाहेर पडलेलो होतो.

— प्रकाश बाळ जोशी

आज दिनांक : 20 जानेवारी 1994

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..