दवणा/दमनक ह्याचे २-३ मीटर उंच दाट उगवणारे सुगंधी क्षुप असते.फांद्या अंगठ्या एवढ्या जाड असतात.ह्याची पाने १५-१७ सेंमी लांब व रूंद असतात.पानाच्या मागील पृष्ठावर पांढरी लव असते.वरच्या भागात पुष्प येते जे गुच्छ स्वरूपात मंदिरात येते.
ह्याचे उपयुक्तांग पंचांग व क्षार असून हे चवीला कडू,तुरट व उष्ण गुणाचे व हल्के रूक्ष तीक्ष्ण असते.हा त्रिदोषशामक असून प्रामुख्याने कफवातनाशक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)वेदना व सूज ह्यावर दवण्याचा लेप करतात.
२)ह्याचा क्षार गर्भाशय संकोचक असून मासिकपाळीच्या तक्रारीत उपयुक्त आहे.
३)दवणा आमपाचक असल्याने तापात उपयोगी आहे.
४)दवणा पित्तसारक असल्याने यकृत विकारात उपयुक्त आहे.
५)ह्याचे तेल किटकनाशक आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️ Dr Swati Anvekar
Leave a Reply