मोकळं ढाकळं बोलली म्हणून
तिला स्वैर समजू नकोस
बिनधास्त व्यक्त झाली म्हणून
तिला बदफैल ठरवू नकोस
स्वतंत्र अस्तित्व बाळगते म्हणून
तिला बेजबाबदार मानू नकोस
आभूषणे, पेहराव असा म्हणून
हिणवून कावळ्यागत टोचू नकोस
मनात तिच्या जरा डोकावून बघ
कपड्यावरून मापं मोजू नकोस
स्त्री असण्याआधी ती माणूस आहे
एवढं किमान कधी विसरू नकोस!!
— वर्षा कदम.
Leave a Reply