तुझं-माझं आयुष्य
आहे एक पिंपळपान
वार्धक्याच्या उंबरठ्यावर
शरीर झाले जाळीदार….
भुतकाळात शिरलो की आपण दोघे क्षणार्धात
याच पिंपळ वृक्षाखाली
बसलो होतो तासनतास….
तारुण्यातली रग होती
जगण्यातली धुंदी मोठी
सुखी संसाराच्या सारीपाटावर पडली दानं खोटी होती.
पानगळीच्या ऋतूत पानगळ झाली
जवळ तेवढी फांद्यांची
जाळी तेवढी शिल्लक राहिली
वहीतलं पिंपळपान
तुझं नी माझं
गीत गात हलकेच
पण जाळीतून निसटून जातो
म्हणूनच म्हणतो सखे
तुझं माझं आयुष्य
एक पिंपळ पान ….
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply