थोडंसं झुकून माझ्या डोळ्यांवर , तुझ्या पापण्या ठेव,—
त्यांच्यातील ओलावा घे टिपून, अलगद हृदयापर्यंत थेट,—
जखमी मनाला असा दिलासा,
तूच देऊ शकशील बघ,
घायाळ मनाची करूण व्यथा, तुलाच फक्त समजेल,—!!!
त्यातली शल्यें, टोंच, बोंच, त्यातला सगळा आक्रोश,
तुझ्यापर्यंतच ना पोहोचेल,-? रक्ताळलेला तो प्रत्येक अश्रू , बघण्याची, पुसण्याची कुवत,— तुझीच असते नेहमीच,—!!!
त्या दुःखाला जीवघेण्या,
सुखात करतोस परावर्तित,
ही अशी जादू विलक्षण,
येते तरी तुझ्याकडे कुठून,–? वाटते कधी,– सगळं संपलं,
कडेलोटाकरता उभे आपण,
पण तुझा जादू – ई– स्पर्श,
थरारून उठते सगळे तनमन,–
लहान वाटतं दुनियेचं वर्तुळ,
इतकं मोठ्या आकाराचं,
माझं तुझं प्रेमावकाश,–!!!
कधीतरीच छळतं एकटेपण,
आसवं गळतात डोळे मिटल्यावर, यातना वेदनांची ती सरमिसळ, मध्ये भासतोस तू ,-उभा पहाड, खडा होतो कोसळता जीव, सामावण्यासाठी तुझ्या मिठीत यातना वेदना पडतात मागेच,
येऊन तू करतोस अमृतस्पर्श,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply