नवीन लेखन...

मुक्ती

आयुष्याच्या प्रवासात बर्‍याच घटना घडत असतात.कधी त्या आनंददायक असतात,कधी क्लेशदायक कधी मजेशीर,कधी खट्याळ,कधी खट्टया-मिठ्या तर कधी… विलक्षण…आणि अविश्वणीय…असाच एक अनुभव आपल्याशी शेअर करतोय…

मुक्ती (एक थरारक अनुभव)

अगदी सकाळी सकाळीच बंंद खिडकीच्या बाहेर चालु असलेल्या कावळ्याच्या कावऽऽ …कावऽऽ, कावीेेने अक्षरशः माथा उठला होता.म्हणूनच रागारागाने खिडकीचं दार उघडलं तसा एक कावळा भुर्रकन उडाला आणि समोरच्या इमारतीवर जावून बसला पण त्याची कावऽऽ कावऽऽ मात्र थांबली नाही. त्यातच मोबाईलची रिंग वाजली…..
“हैैल्लो,मि.राजन,हॅव अ नाईस डे… अँड काॅन्ग्रेच्युलेशन्स”
बँँकेेच्या हेड ऑफिस मधून आलेल्या फोनमुळे मी काहीसा गौंधळलो.
“Thank you सर…पण………… ?”
“अरे यार,आत्ताच प्रमोशनची लिस्ट मेलवर पोस्ट केलीय… ज्यात तुझ नांव आहे आणि महत्वाच म्हणजे कोकणात
नवीनच ओपन होत असणाऱ्या आपल्या शाखेत तू मॅनेजर म्हणून जातोयस…वन्स आगेन काॅन्ग्रेच्युलेशन अँड ऑल दि बेस्ट”.
कोल्हापूूर ते रत्नागिरी आणि तिथून अनेक चढउतार पार करत हिरव्यागार झाडीतून वेडी वाकडी वळणे घेत डोंगराच्या कुशीत वसलेल्या त्या छोट्याश्या देेवाकवाडीच्या फाट्यावर एस.टी. थांबली.एस टी.च्या दरवाज्यातूून खाली उतरतोय न उतरतोय तोच समोरच्या झाडावर बसलेल्या कावळ्याची काव-काव पुन्हा कानावर पडली पण त्याकडे दुर्लक्ष करत बँक इमारतीच्या मालकाला फोन लावला.थोड्या वेळातच तो त्याच्या फटफटीवरून आला आणि मी बँकेच्या शाखेत पोहचलो.
एका भल्यामोठ्या इमारतींच्या तळमजल्यावर बँँकेेच ऑफिस थाटलं होतं.शेेजारी स्वतः घरमालक रहात होता तर वरच्या मजल्यावर मॅनेजर रेसिडन्स होतं.
शाखेेच्या समोरच एक पिंपळाचं भल मोठ झाड होतं.पण विशेष म्हणजे आजूबाजूची सगळी झाडे हिरवीगार असताना हे झाड मात्र पूर्णपणे वाळलेेलं आणि निष्पर्ण होतं.
दरम्यानच्या काळात घरमालकाशी माझा चांगलाच घरोबा होऊन राहीला होता.साठीच्या आसपास असणाऱ्या घरमालकाला मुलबाळ नसल्यामुळे तो आणि त्याची बायको एव्हडीच त्या मोठ्या इमारतीत रहात होती.नाही म्हटलं तर त्याला एक धाकटा भाऊ होता पण तो बरीच वर्षे बेपत्ता होता.पण गावात अशी कुजबूज होती की इस्टेटीसाठी घरमालकाने त्याचा खून केला होता.
असच एकदा सुट्टीच्या दिवशी मी घरमालकाच्या घरी गप्पा मारत बसलो असताना बाजूच्या खिडकीत कावळ्याची एकसारखी काव काव चालू होती.घरमालकाने रागारागाने त्याला हुसकावून लावले तसा सवयीप्रमाणे तो कावळा पुन्हा झाडावर जावूून बसला मात्र त्याची काव काव चालूच होती.
सहजच माझं लक्ष समोरच असणाऱ्या वाळक्या पिंंपळाच्या झाडाकडे गेलं तस कुतूहलापोटी मी त्या झाडाबद्दल घरमालकाला विचारलं तर तो एकदम चमकला पण पुढच्याच क्षणी शांत होत गुढ हसला.
होता होता तीन वर्षे कशी निघून गेली समजलचं नाही.आता ट्रान्सफरचे वेध लागले होते.बँकेची प्रत्येक स्तरावर व्यवस्थित वाटचाल चालू होती.त्यामुळेच पुढचं पोस्टींग चांगल्या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा होती.
पण त्या मध्यरात्री मी गाढ झोपेत असताना भलतचं घडलं…
म्हणजे अचानक सर्वांगाला दरदरून घाम सुटला आणि एका भयंकर स्वप्नातून मी जागा झालो.अस वारंवार घडू लागलं तेंव्हा मात्र डाॅक्टरांना भेटलो पण सगळे मेडीकल रिपोर्ट नाॅर्मलच आले तरीही त्यानंतर कमालीचा अशक्तपणा आणि अधूूमधूून ताप येणे असा सिलसिला चालूच राहीला.का कुणास ठाऊक पण त्या दिवसा पासून मी एका अनामिक दडपणा खाली राहू लागलो.
जेंव्हा खूपचं असह्य होवू लागलं तेव्हा हेडऑफिसला ट्रान्सफर साठी विनंती केली.सुदैवाने ट्रान्सफरसाठी मी ड्यू असल्यामुळे पुढच्याच आठवड्यात गावाजवळच्या शाखेेत बदलीची ऑर्डरही आली.पण रिलिव्हर मिळत नसलेनं माझा मुक्काम वाढतच राहिला.
त्या दिवशी सर्वपित्री अमावस्या होती.रात्री घरात भयंकर गरम होत होतं म्हणून गॅलरीत चटई अंथरली.बाहेर काळाकुट्ट अंधार पसरला होता मात्र समोरच असलेल्या पिंपळाच्या वाळक्या झाडाभोवती काजव्यांचा थवा पिंंगा घालत होता त्याकडे पहाता पहाता केंव्हा झोप लागली कळलचं नाही.
मात्र पहाटेच्या सुमारास सर्वांगाला दरदरून घाम सुटला. कुणीतरी माझ्या उरावर बसल होतं आणि मला गदागदा हलवत सांगत होतं…
“घाबरु नकोस…पण माझा बदला पुर्ण झाले शिवाय,तुझी इथून सुटका नाही.उठ,हातात कुदळ घे,मी त्या वाळक्या झाडा खालीच आहे.”
अंगावरचा घाम पुसत मी खाडकन उठलो.कोपर्‍यात पडलेली कुदळ दिसताच माझ्या अंगात कशाचातरी संचार झाला आणि माझे पाय नकळत त्या वाळक्या झाडाकडे वळले.काही क्षणातच झाडाखालची माती बाजूला केली आणि कुुदळीचा शेवटचा घाव गंजलेल्या तारेत करकचून बांधलेल्या सांगाड्यावर पडला तसा वीजेच्या गतीने माझ्या सर्वांगावर सरसरुन काटा
आला त्याचरोबर एका मानवी कवटी खाडकन माझ्या पायात येेऊन पडली.
बापरे! ते थरारक दृश्य पाहून माझी तर बोबडीच वळली.
नेमक्या त्याचक्षणी घरमालकाच्या घरातून ओरडण्याचा आवाज आला.तसा मी धावतच त्याच्या घरात गेलो तर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या घरमालकांच्या तोंडातून एकसारखा फेस बाहेर पडत होता.तातडीनं डाॅक्टरांना पाचारण केल पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही कारण त्या आधीच घरमालकाचा कारभार संपला होता.
दोन दिवसात माझा रिलिव्हर देेवाकवाडीत हजर झाला. ऑफिस प्रिमायसेस मध्येच माझा छोटासा सेंडऑफचा कार्यक्रम पार पडला.
दुसर्‍या दिवशी अगदी सकाळी सकाळीच सगळ्यांचा निरोप घेेवूून मी बाहेर पडलो.नेेमक्या त्याच क्षणी एक कावळा माझ्या भोवती गिरकी मारून डोक्यावरून भुर्रकन उडाला आणि त्या वाळक्या पिंंपळाच्या झाडावर बसला.आता त्याची मोठ मोठ्या आवाजात कावऽऽ, कावऽऽ सुरू झाली होती.
ओरडणार्‍या कावळ्याकडे कुतूहलाने पहाता पहाता सहजच माझं लक्ष त्या वाळक्या पिंंपळाच्या झाडाकड गेलं तर…
अगदी शेंड्यावरच्या फांदीवर एक हिरवीगार पालवी फुटली होती

– राजन पोळ
7588264328
(कृपया सदर कथा आवडलेस नांवा सहीत फाॅरवर्ड करावी ही नम्र विनंती)

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..