नवीन लेखन...

मुलं आणि फुलं

नाजूक, निर्लेप आणि निखळता ज्यांच्यात आहे अशी फुलं आणि हेवा, दावा, व्देष यापैंकी कोणताही रंग ज्यांच्यावर चढलेला नाही अशी मुलं. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू…! कशा..! फुलं उमलतं, बहरतं आणि सुगंधतं. त्याच्या उमलणं स्वाभाविक असतं. आतून आलेलं असतं. कुणी त्यासाठी विशेष प्रयत्न करत नाही, म्हणूनच ते प्रभावी असतं, परिणामकारक, आपलं करणारं असतं.

मुलंही अशीच असतात. स्वच्छ मनाची, नितळ, कोमल आणि भावनाशील देखील. त्यांचं उमलणं देखील स्वाभाविक असतं. आकलनं करत ती वाढत जातात. ती जशी वाढतात… तशी मात्र त्यांच्यात बदल होत जातो. जसं फुलांना माहिती नसतं पुर्ण उमलल्यानंतर त्याच काय होणार ते. फुलं कुणाच्या गजऱ्यात जाऊन बसणार, की हार बनुन मूर्तीच्या गळ्यात जाणारं. की नेत्याच्या प्रतिमेला जाऊन भिडणारं. की शहीदाच्या स्मारकावर अभिमानानं जाऊन पडणारं. त्याला ते माहित नसतं. तसंच मुलांचही असतं ना. लहान असतात तोवर आई-वडिलांच्या बरोबर असतात. शाळेत गेली की मित्र येतात, शिक्षक येतात त्यांच्या मनाला आकार येऊ लागतो. आपल्या अपेक्षा साकारत लहान असलेली मुलं मोठी होऊ लागतात. त्यांचे पुढे काय होणार माहित नसते. ते चांगल्या मार्गाला लागणार की वाईट, हे आपल्याला माहित नसतं.

मानवी आयुष्यात फुलं आणि मुलं दोघेही महत्वाची आहेत. फुलांना पाहण्यातच निखळ सौंदर्याचा आनंद मिळतो. मुलांना पाहण्यात जगण्याची उर्जा मिळते. मात्र फुले आपण जशी वाढवतो, जोपसतो, जपतो त्यांची काळजी घेतो. त्यांचे नाजुकपण सांभाळतो. मुलांचे तसे करतो का? मुलांना तितक्याच नाजुकपणे सांभाळतो का? त्यांचे भावविश्व जपतो का? की आपल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली त्यांच्या भावविश्वाची घडी विस्कटतो. की स्पर्धेत उतरवून त्यांच्या मनाची कोमलता हिसकावून घेत आहोत. की शिक्षणाच्या नावाखाली त्यांना अकालीच मोठे करतो आहोत. पालकांच्या अपेक्षा मुलांनी पुर्ण कराव्यात यात गैर काही नाही, पण मुलांच्या अपेक्षांचे काय? त्यांना काय वाटते आहे, याचा विचार केला जातो का? गुणांच्या मागे लागतांना गुणवत्तेचं काय झालं आहे, याचा आपणही थोडा गांभीर्याने विचार करायला पाहिजे.

मुलं म्हणजे गुणांचं मशीन नाही, पालकांना असे का वाटते त्याने पैकीच्या पैकी मार्क मिळवलेच पाहिजेत म्हणून. आपल्या मुलाने विविध स्पर्धात भाग घेतला पाहिजे. त्याला गणित, विज्ञान, इंग्रजी विषयांसह इतरही सर्व विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले पाहिजे. त्याला प्रत्येक खेळात पारितोषिक मिळाले पाहिजे. या सारख्या अपेक्षा आपण पालक व्यक्त करतो आणि मुलांना त्यांची दमछाक होईपर्यंत धावायला लावतो. या धावण्यात त्यांच्या निरागसपणाचे काय होत असेल. त्याच्या भावविश्वाचे काय होत असेल. त्याच्या मनाच्या कोमलतेचं काय होत असेलं. फुलांना जपतांना आपण जेव्हढी काळजी घेतो तितकीच काळजी किंवा त्यापेक्षा अधिक काळजी मुलांच्या मनाची घेतली गेली पाहिजे. तेव्हाच ती बहरतील, हसतील, बागडतील आणि सुगंधही देतील. त्यांचे बहरणे, फुलणे आपल्यावर अवलंबून आहे. मुलांना त्यांच्या स्वाभाविकपणे बहरू द्याना. तेव्हा विचार करा आणि जपा, आपल्या घराच्या अंगणात फुललेल्या आपल्या फुलांना…!

दिनेश दीक्षित, जळगाव (९४०४९५५२४५)

Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित 46 Articles
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..