तीन तपे गेली गौरी घरी नव्हती आली
चिमुकल्या पावलांनी दारी प्रकटली
गौरी आली गौरी कसे करू मी स्वागत
हृदयाच्या पाळण्यात झेलते अलगद ।।
गौरी आली गौरी आनंदले घरदार
आगमने तिच्या परिपूर्ण हा संसार ।।
गौरी आली गौरी सानथोर पुलकित
कुठे ठेवू कुठे नको झाले कवतिक ।।
गौरी आली गौरी झूला फुलांनी सजवा
सोनुल्या ह्या अपर्णेला पाळणी मिरवा ।।
गौरी आली गौरी सोन्या मोत्यांनी नटवा
रेशमाच्या गादीवर हलके जोजवा ।।
गौरी आली गौरी वाटा बाई गोड धोड
आजी काकी मामी मावशी पुरवती कोड ।।
गौरी आली गौरी नांव ……….. ठेवियले
……. च्या कुळी लाख दिवे उजळले ।।
(आडनांव)
Leave a Reply