नवीन लेखन...

कांदेपुराण – बहुगुणी औषधी कांदा

Multipurpose Medicinal Onion

२१) दमा – कांद्याचा रस गरम करुन दिवसातून दोन वेळा काही दिवस घेत राहिल्यास दम्यावर आराम वाटतो.

२२) नाक फुटणे – उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमूळे बर्‍याच लोकांचे नाक फुटून रक्त येते. त्यावर कांद्याचा ताजा रस काढून तो नाकात टाकावा. नस्य द्यावे, नाक फूटणे बंद होते.

२३) कान दुखणे – कांद्याचा रस गरम करुन तो थोडा दुखर्‍या कानामध्ये टाकावा त्यामुळे दुखणे शांत होते.

२४) मासिक पाळी अनियमित होणार्‍या स्त्रियांनी कांदा खाण्यामधे जास्त वापरावा.

२५) मुर्छा बेहोशी या विकारात ताबडतोब कांदा पोडून तो सुंगवण्यास द्यावा.

२६) कांद्याचा ताजा रस आणि गाईचे तूप मिळवून खाल्ल्यास विर्यंशुध्दी होण्यास मदत होते.

२७) रक्ती मुळव्याध – साखर व साधारण तेवढाच कांद्याचा ताजा रस एकत्र करुन घेतल्याने मुळव्याधीवर चांगला फायदा होतो.

२८) पोट दुखणे – कांद्याच्या रसात हींग व काळे मीठ मिळवून ते घ्यावे. त्यामूळे पोट दुखणें, पोटात बैचेन वाटणे बंद होते.

२९) कांदा उत्तम खुराक व उत्तम औषध आहे. कांदा ही गरीबाची कस्तुरी म्हणून संबोधण्यात येते. त्यात लोहत्तव विपुल प्रमाणात असल्यामुळे पंडू रोगांवर हे एक उत्तम औषध आहे. कांदा रक्त शोषक असल्यामुळे, त्वचा रोगावर त्याचा उपयोग होतो. कांद्यात गंधक, फॉस्फरस, सायट्रीक अॅसीड, शर्करा, अल्बूमिन तसेच इतर क्षार भरपूर प्रमाणात असतात. यात जीवन सत्व ‘सी’ देखील बर्‍याच प्रमाणात आढळते. रात्री जेवणाबरोबर कांदा खाल्याने झोप चांगली लागते. ज्याना घाम येत असेल किंवा दुर्गंधी येत असेल त्यांनी कांदा लसून याचा वापर करावा. अपस्मार जलोदर, किडनी इत्यादी रोगांवर कांदा हे औषध आहे. लहान मुलांना कांद्याचा रस कृमी रोग, सर्दी, अपचन, मलावरोध, खोकला वगैरे रोगावर यशस्वीरीत्या देतात.

३०) आयुर्वेदाच्या दृष्टीने कांदा शक्तीवर्धक, तिखट, जड, रुचकर व वयवर्धक आहे. कफ तसेच निद्रावर्धक आहे. क्षय, क्षीन, महारोग, वांत्या, कॉलरा कृमी,अरुचि, स्वेद, सूज तसेच रक्तांच्या विकारावर कांदा हा उपयुक्त आहे.

३१) लाल रंगाचा कांदा बारीक करुन तुपात लाल होईपर्यत शिजवावा. कांद्याला लाली येताच त्याला गव्हाची पोळी किंवा भाताबरोबर खाण्यास द्यावे. हिवाळ्याच्या दिवसात दररोज सेवन केल्यास नपुसकता नष्ट होते शक्ती येते..

३२) गळू पक्व होत नसेल व अतिशय त्रास देत असेल तर एक लहानसा कांदा घेवून त्याचे चार भाग करुन एका भागात हळद भरुन विस्तवावर गरम करावी व सहन होईल तितका गरम कांदा त्या गळूवर ठेवून पट्टी बांधावी, गळू पक्व होवुन फूटेल व त्यातील रक्त, पू वगैरे निघून जावून दु:ख मुक्त होता येईल.

३३) कांदा जंतूनाशक आहे. कापलेल्या कांद्याच्या वासाने शरिराची हानी करणारे जंतू नाश पावतात. जेवणापूर्वी कांद्याची कोशिंबीर बनवून ठेवण्याच्या पध्दतीच्या पाठीशी हेच रहस्य आहे. कांदा कापून ठेवला असेल तेथे साप येण्याची हिंमत करु शकत नाही. विषारी जंतूच्या दंशावर कांद्याचा रस चोपडल्याने दु:ख नाहीसे होते. भ्रमर, विषारी जनावरे, माशा किंवा विंचवाच्या दंशावर हे रामबाण असल्याचे साबित झाले आहे. कॉलरा वगैरेच्या भितीपासून कांदा रक्षण करतो. कित्येक मुलांच्या शरिराची वाढ होत नसते. अशा मुलांना जेवणात कांदा व गुळ द्या. यामुळे शारीरीक विकास अति वेगाने होईल. विशेषत: खेड्यातील लोक जेवते वेळी भरपूर कांदा खातात. यामुळे खर्च झालेली शक्ती परत येवून शारीरात शक्ती परत येवून शरीरात स्फूर्ती, शक्ती व उष्णतेचा संचार होतो.

३४) नजरचुकीने एखादेवेळी पानातून तंबाखू खाल्ला गेला व त्यामुळे चक्कर किंवा उलटी झाल्यासारखी वटली तर ताबडतोब एक दोन चमचे कांद्याचा रस घ्यावा. त्यामुळे तंबाखूपासून झालेला दुष्परिणाम दुर होईल.

३५) एखादा मनुष्य बेशुध्द होवून पडला. फेंफरे किंवा हिस्टोरियाचा झटका येवून पडला तर कांदा फोडून नाकाशी धरावा. थोड्याच वेळात तो मनुष्य शुध्दीवर येईल.

३६) जेवणात योग्य प्रमाणात कांद्याचा उपयोग केल्याने कॅन्सरचा विकार वाढत नाही.

३७) पांढर्‍या कांद्याच्या रसात शुध्द मध टाकून १-२ चमचे रस घेतल्याने वीर्य शुध्दी होते.

३८) नाकातून रक्त पडत असेल तर कांद्याच्या रसाचा १-चा थेंब नाकात टाकल्यास रक्त येणे बंद होईल.

३९) कांद्याच्या उपयोगाने कफ पातळ होवून पडूनच जातो आणि नविन होत नाही. त्याच्या उपयोगाने आतडी व्यवस्थित होतात. भूक कडकडून लागते.

४०) द्राक्षासवात तळलेला कांदा कावीळ व अपचनावर दिल्याने चांगला फायदा होतो.

४१) कांद्याचा रस कापसाच्या बोळ्यात अगर कपड्यावर घेवुन कानात थेंब टाकल्याने कानात होणारा आवाज बंद होतो.

४२) दुखत असलेल्या दातावर कांद्याचा कीस ठेवावा.

४३) कांदा सूज येण्यावर उत्तम औषध आहे. कांद्याचा कीस एक फडक्यात घेवून लहानशी पुरचुंडी करुन वाफेवर धरुन नंतर सूज असलेल्या भागावर ठेवावी ५ ते १० मिनीट ठेवल्याने थोड्याच वेळाने सूज निघून जाते. कांदा पाण्यात टाकून नंतर उकळून त्याच्या वाफेचा शेक घेतल्यानेंही सूज कमी होते. सूज असलेल्या भागावर कांद्याचा हा प्रयोग करण्यात आल्यास फार चांगला फायदा होतो.

 

संकलन – पूजा प्रधान 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..