नवीन लेखन...

बहुपयोगी सोलर पंप

आजच्या काळात वीज भारनियमन ही फार गंभीर समस्या बनत चालली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पर्यायी ऊर्जास्रोत म्हणून सौरऊर्जेकडे बघितले जाते. सौरऊर्जेत सुरुवातीला जरी गुंतवणूक जास्त वाटत असली तरी नंतर ती दामदुपटीने वसूल होते. सौरऊर्जेवर चालणारे असेच एक साधन म्हणजे सोलर पंप.

आपण गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी टाक्यांमध्ये चढवण्यासाठी विजेवर चालणारा पंप वापरतो त्याचे बिल खूपच अधिक असते. शेतक-यांना शेतात पिकांना पाणी देण्यासाठी अशा प्रकारचे पंप लागतात. फार्म हाऊस, ड्रीप इरिगेशन यासाठीही त्याचा उपयोग करता येतो. आपल्या देशात वर्षाचे आठ महिने तरी सूर्यप्रकाश मुबलक असतो त्यामुळे या काळात तरी सोलर पंप सहज चालू शकतो. शेतक-यांना तर या साधनाने सुरुवातीला थोडी गुंतवणूक करावी लागली तरी नंतर बरेच पैसे वाचू शकतील शिवाय वीज भार नियमनाच्या कटकटीतून सुटका होईल.

सौर पॅनलला ट्रकर जोडला तर त्याची क्षमता ३० ते ५० टक्के वाढू शकते. हा सोलर पंप आवश्यकतेनुसार बॅटरी, वीज, सौरऊर्जा अशा सर्व पर्यायांनी चालवता येतो त्यामुळे पुरेसा सूर्यप्रकाश नसेलच तर हे पर्याय खुले राहतात, थोडक्यात सोलर पंपमुळे तुम्ही तुमचे काम तुमच्या मर्जीप्रमाणे कमी खर्चात करता.

सोलर पंप हे ०.२५ हॉर्सपॉवरपासून ते ५ हॉर्सपॉवरपर्यंत उपलब्ध आहेत. सोलर वॉटर पंप हे फोटोव्होल्टॅइक पॅनेल्सवर चालतात. या पॅनेल्समध्ये सोलर सेल हा मुख्य घटक असतो. सोलर सेलमध्ये सिलिकॉनसारख्या अर्धवाहक पदार्थांचे थर असतात त्यात सूर्य प्रकाशामुळे डायरेक्ट करंट (डीसी) तयार होतो. हा वीजप्रवाह पॅनेल्समध्ये गोळा केला जातो व नंतर डीसी पंपला पुरवला जातो. नेहमी बॅटरी कपल्ड सोलर वॉटर पंपचा वापर करावा त्यामुळे सूर्यप्रकाश नसतानाही तो काही काळ चालू राहतो. तुम्हाला बगीच्या साठी वापरायचा असेल तर सोलर फाउंटन पंपही उपलब्ध आहे. त्यामुळे कारंजी उडतात व झाडांना आवश्यक तेवढे पाणी मिळते.

सोलर वॉटर पंपात फ्लुईड पंप, इलेक्ट्रीक मोटर, सोलर पॅनेल व इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर असे घटक असतात. यात किमान २०० ते ३००० वॉटची मोटर वापरली जाते, तर १८०० डब्ल्यूपी (वॉटस पीक) क्षमतेचे सोलर पॅनेल्स वापरले जातात. या साधनामुळे प्रदूषण होत नाही व डिझेल तसेच विजेच्या खर्चात बचत होते हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..