नवीन लेखन...

मूल्यवान ठेवा! (माझी लंडनवारी – 21)

आज सोमवार, 9 ऑगस्ट 2004. आज मला आणि प्रियांकाला इंडियन एम्बसी मध्ये जायचे होते. रविवारीच नीलम (माझी इंडियातील PM) ला फोन करून प्रियांकाची केस सांगितली आणि सोमवारची एक दिवसाची रजा मंजूर करून घेतली. ती मार्टिनला मेल करून पेड लिव्ह संक्शन करून घेणार होती. कंपनी नियमाप्रमाणे एक महिना ऑन साईट काम केलं की एक पेड लिव्ह sanction होते. मला अजून महिना झाला नव्हता. पण त्यांनी ही केस consider केली. मी उमेश बरोबर मार्टिनला पण मेसेज पाठवला होता. आणि उमेशला सांगितलं check if he wants me half day in office, keep message in RCA reception. I will check at RCA reception.

एक दिवसाची पौंडस मधली पेड लिव्ह रुपीज मधल्या पेड लिव्हपेक्षा मूल्यवान आहे, असं मनात आलं.

सगळे प्रियांकाला see-off करून ऑफिसला गेले. आम्हाला दहा वाजता पोचायचं होत. आम्ही आरामात आवरून, प्रियांकाच थोड पॅकिंग करून मग निघालो. दोघींनाही रुख-रुखं वाटत होती. मला इथे खूप understanding चांगला ग्रूप मिळाला होता पण आपलं माणूस आज आपल्या भारतातल्या प्रिय माणसाकडे जाणार आणि मी तिला नुसतच एअर पोर्टला सोडून येणार नाही म्हटलं तरी मला थोडा हेवा, थोड वाईट वाटत होतं. शैलेश आणि संजू मामा तिला एअर पोर्टवर receive करायला येणार होते. एरवी ती भेटलीच नसती तर कदाचित मी होम सीक नसते झाले.

असो! आम्ही सावकाश सगळं आवरून 9.45 ला एम्बसी मध्ये हजर होतो. लंडन मध्ये राहून वेळ पाळायला नक्कीच शिकलो होतो.त्यातून सगळच घड्याळाच्या काट्यावर चालत मग delay होण्याचा प्रश्नच नाही. ट्रेन 4 मिनिटात येणार म्हणजे येणार, तुमचे स्टेशन 12व्या मिनिटाला येणार म्हणजे येणार. तुमचं घड्याळ एक वेळ चुकीची वेळ दाखवेल पण त्यांचं टायमिंग चुकणार नाही.

10 मिनिटे बाहेर थांबून बरोबर 10 वाजता आत गेलो. आतले दृश्य बघून अंगावर काटाच आला. एक तर आत्तापर्यंत पाहिलेल्या लंडन सौंदर्याला मोडीत घालून एकदम आपल्या देशात आल्यासारखे वाटायला लावणारे वातावरण आणि रचना. बऱ्यापैकी पसारा. परक्या देशात आपलेपणा वाटायला लावयाचा प्रयत्न असेल बहुदा त्यांचा! फरक इतकाच की भारतातल्या सरकारी ऑफिस प्रमाणे कळकट मळकट नव्हता काही.त्यात तिथल्या हवेचा दोष हो! नाही तर आपल्या लोकांनी आपण इंडियात आहोत असं वाटायला लागण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता.

आणि त्यात भर म्हणजे तिथे बरीच लोक होती. एवढ्या सगळ्या लोकांचे पासपोर्ट हरवले की काय? पण मग कळले की इमर्जन्सी व्हिसा सुध्धा इथेच process होतो. बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होते. एक जोडपे होते तिथे. त्यातली बाई रडत होती. आम्ही आस्थेने चौकशी केली तर कळले,दोघांचे पासपोर्ट हरवले आहेत आणि duplicate passport साठी हि त्यांची चौथी खेप आहे. प्रत्येक वेळी, ही कागद पत्रे आणा, असे फोटो आणा अस करत आठवडा उलटला आहे पण त्यांना duplicate passport मिळाले नाहीत. हे ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली. प्रियांका तर अक्षरशः रडवेली झाली. स्वतःला सांभाळत तिला धीर दिला. मग तिथे काउंटरवर प्रियांकाने सांगितले travel document हवंय. पासपोर्ट हरवलाय. मग त्यांनी एक फॉर्म भरायला दिला. त्यासोबत पोलिस complaint, ticket copy जोडायला सांगितली आणि 2 फोटोज् सबमिट करायला सांगितले आणि सांगितले 4 वाजता या.

तिने निघताना request केली की आज रात्रीच फ्लाईट आहे, आज होईल ना काम? होकार मिळताच आम्ही तिथून बाहेर आलो. आज इंडियाला जाता येईल का नाही अशा संमिश्र विचारात आम्ही परत रूम वर आलो. मार्टिनने ही माझी रजा सॅंक्शन केली होती असे आम्हाला रिसेप्शनमधे कळले. आता आमच्याकडे 4 वाजेपर्यंत वेळ होता. प्रियांकाला शॉपिंग करायचे होते आणि मला पण थोडी चॉकलेट्स घरी पाठवायची होती.

मग आम्ही शॉपिंगसाठी बाहेर पडलो.बाहेरचं जेवण घेवून Claire’s मध्ये गेलो. ते लेडीज accessories साठी खूप प्रसिद्ध आहे.तिथे आमचा बराच वेळ गेला भरपूर शॉपिंग केल. कानातले, necklaces, स्कार्फ, purses, ladies watches किती variety and new fashion designs. यश (माझी भाच्ची) तिच्यासाठी तर मला आख्ख दुकानच उचलून न्यावस वाटलं. मग कुटुंबातील तमाम स्त्री वर्गासाठी छोट्या मोठ्या गिफ्टस घेतल्या. प्रियांकाने पण भरपूर शॉपिंग केलं. आता हॉटेलवर परतणे भाग होते. एवढं वजन घेवून काय फिरणार? त्यामुळे चॉकलेट शॉपिंग idea बाद केली. प्रियांकाला सांगितलं, तू एअर पोर्टवर तुझी आणि माझी थोडीशी चॉकलेट्स घे.

आता रूमवर येवून आम्ही पटकन पॅकिंग केले. 4 वाजता बॅग घेवूनच जायचे ठरले होते कारण तिथे किती वेळ लागेल माहीत नव्हत आणि आम्हाला आता कुठलीही रिस्क घ्यायची नव्हती. प्रियांकाला 7 च्या आधी एअर पोर्ट वर पोचायचं होते. म्हणून आम्ही बॅग्स घेवून निघालो.निघताना गळा भेटी आणि गळा काढून भेटी झाल्या. बाहेर येवून आम्ही टॅक्सी करून परत embassy ला गेलो. टॅक्सीला रिक्वेस्ट करून तिथेच थांबायला सांगितलं. आत गेलो तर प्रियांकाला आतमध्ये बोलावलं आणि मला बाहेर काउंटरपाशीच थांबवलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रियांकाने सबमिट केलेले फोटो आणि इंडियाहुन email आलेला पासपोर्ट वरचा फोटो मॅच होत नव्हते. आता प्रियांका पुरती frustrate झाली होती.मला बाहेर ह्याची काही कल्पना नव्हती. तिने रणचंडीचे रूप धारण केले.मला बाहेरून ती तावातावाने काही तरी बोलत असताना दिसत होते. तिने त्या ऑफिसरलाच फैलावर घेतले. आल्यावर तिने सगळा किस्सा सांगितला. तिने सरळ त्याला विचारलं की, इतकी साधी सरळ केस आहे. मी इंडियातील आहे,मला तिकडे जायचंय, माझ्याकडे पासपोर्ट नाहीये तर तुम्ही मला मदत करणार नाही तर कोण करणार? माझे आई-बाबा तिकडे वाट बघतायत. मी एकटी इथे आहे. असे बरेच इमोशनल डायलॉग तिने मारले. मला तिच कौतुक वाटलं. त्याही पारिस्थितीत तिने जिद्द सोडली नाही.

एवढी बडबड ऐकण्याची त्याला कदाचित सवय नसणार किंवा त्याच हृदय परिवर्तन झालं असणार. त्याने तिला 15 मिनिटे बाहेर बसायला सांगितले आणि 15व्या मिनिटाला तीच ट्रॅव्हल डॉक्युमेंट घेवून तो हजर! आम्हाला ‘sorry! to keep you waiting’ अस म्हणून ते डॉक्युमेंट आमच्या ताब्यात दिले. तो एक सील बंद लिफाफा होता.जो फक्त इम्मिग्रेशन ऑफिसरच ओपन करू शकतात. सील ब्रेक झालं तर तू फ्लाईट बोर्ड करू शकणार नाहीस असे बजावून तो त्याच्या पुढच्या कामाला निघून गेला. आम्हाला संजीवनी मिळाली होती. त्या संजीवनीला तळ हाताच्या फोडासारख जपत आम्ही थेट एअर पोर्ट गाठले. थोडावेळ तिथे थांबून चहा-कॉफी घेतले.मग एकमेकींच्या निरोप घेतला.तिला बजावून ठेवलं, काहीही प्रॉब्लेम झाला तर लगेच हॉटेलवर ये. माझ्या डोळ्यासमोर तिचं चेक इन झालं. ती दिसेनाशी होईपर्यंत एकमेकींना अच्छा करत उभे होतो. ती गेल्यावर पण मी तासभर तिथेच रेंगळले. उगीच काही प्रॉब्लेम झाला तर आपण इथेच असावं म्हणून. ज्या अर्थी ती बाहेर नाही आली, त्या अर्थी सगळं नीट झालं असावं अशी मनाची समजूत करून अखेर शेवटी जड पावलांनी हॉटेलकडे परतले. रूमवर येवून एकटीच उदास नर्व्हस होवून बसले होते आणि रूम मधला फोन खणणाला. नीलेशच्या रूम मधून कॉल होता.

‘अहो ताई, एकट्या रडत बसू नका, इकडे या,जेवण तयार आहे.’

आवाज ऐकून क्षणात माझा रडवेल्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि मी एकटी आहे ह्या भावनेची बोच कमी झाली.

हे जीवाभावाचे मैतर हीच तर माझी पौंड्स पेक्षा जास्त valuable कमाई होती लंडन मधली!

— यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..