नवीन लेखन...

सख्यांसह ‘मुंबई हेरीटेज फेरी’

एक अनुभव-

मी मुंबई एकट्यानं किंवा एक-दोघांना सोबत घेऊन खुप फिरलो. एकट्यानं तर किती भटकलो, त्याची गणतीच करता येणार नाही. पहिल्या पहिल्यांदा कुतुहलाने आणि मग अभ्यासासाठी. एकेका ठिकाणी कितीही वेळा गेलो, तरी दरवेळी नव्यानेच काही तरी सापडायचं तरी किंवा तेच ठिकाणं नव्याने उलगडायचं तरी..

कालचा शनिवार दिवस मात्र काहीसा वेगळा होता. मुंबई तिच, ठिकाणंही तिच. बदलली होती फक्त माझी भुमिका. परवापर्यंत एका विद्यार्थ्याच्या भुमिकेत समोरच्या बाकावर असणारा मी, कालच्या दिवसापुरता थेट पलिकडच्या टेबलामागच्या खुर्चित बसलो होतो आणि समोर होते ३० (तिस) बुद्धीमान विद्यार्थी. बोरीवली-दहिसर व बाहेरीलही एकूण ३०-३२ स्त्री-पुरूषांना मुंबई ‘दाखवायच’ची आणि ‘समजावून’ सांगायची जबाबदारी मला देण्यात आली होती. बोरीवली-दहिसरमधील स्त्रीयांच्या ‘सखी’ नांवाच्या अनौपचारीक संस्थेमं ही टूर आयोजित केली होती. हे काही खाऊ नव्हतं. परिक्षा माझीच होती. मला शाळेतले ‘शिक्षक दिन’ आठवले. त्या दिवसापुरती ‘शिक्षका’ची भुमिका विद्यार्थ्याने करायची असते, मी ही केली होती. काय अवघड काम असतं राव ते..! मुलांना त्याची कल्पना यावी यासाठीच शिक्षक दिन साजरा केला जात असावा, पण तो उद्देश किती सफल होत असावा माहित नाही..काल माझी भावना मात्र नेमकी ती आणि तशीच होती.

स्वयंअध्ययन करणं आणि दुसऱ्याला ते शिकवणं खरंच अवघड काम असतं. शाळेत साजरे केलेल्या ‘शिक्षक दिना’मुळे एक मात्र झालं, इतरांचं माहित नाही, पण माझ्या मनात शिक्षक या पेशाविषयी प्रचंड आदर निर्माण झाला. आजही माझ्या आदराच्या दोनच व्यक्ती विशेष आहेत. एक, शिक्षक आणि दुसरी म्हणजे कोणीही कलावंत, लहान-थोर प्रतिभावंत..! ह्या दोन व्य्कतींशिवाय समाज म्हणजे, कपडे घातलेल्या नागव्या प्राण्यांचा कळप, यापेक्षा जास्त काही नाही..! असो.

परवापर्यंत अध्यनाच्या भुमिकेतल्या मला, कालच्या दिवशी अध्यापकाच्या भुमिकेत बसवलं गेलं आणि माझी जबाबदारी कैकपटीनं वाडली. जी माहिती जाईल, ती अचूक असायला हवी ह्या मताचा मी असल्यानेच तशी जबाबदारी वाढली होती. सोबतच्या बहुतेक सर्वांनाचा मुंबई माहित असली तरी तिचा ऐतिहासिक आगा-पिछा माहित नव्हता आणि ते सहाजिकच आहे. आपण सारेच जण ‘चिंता करीतो विश्वाची’ या वैश्विक परंपरेतले असल्याने, आपल्याला अमेरीका-रशीयाचा इतिहास माहित असतो, एखाद्या बुद्रुक देशाचीही माहिती असते, भारताची आणि चिन-पाकिस्तानची सीमा भांडणं का आहेत याचीही बातम्या पाहून खरी-खोटी माहिती असते परंतू आपण ज्या शहरात राहातो, ज्या शहराला कर्मभुमी मानतो, त्या शहराचं ऐतिहासिक मर्म माहिती असतंच असं नाही. किंबहूना नसतेच. पिकतं तिथं विकत नसतं. आपण साऱ्या भारतीयांचा हा ल.सा.वि. आहे असं समजायला हरकत नाही.

नेमक्या याचमुळे माझी जबाबदारी वाढली होती. यांना काय माहित, काही सांगून वेळ मारून नेऊ असा विचार करून चालणार नव्हतं. जे जाईल ते अचुकच हवं, कोण जाणे कालच्या ‘सखी’ ग्रुपातली/ला कोणितरी त्यापासून स्फुर्ती घेऊन पुढे आणखी संशोधन करेल पुढंमागे आणि कालचा त्याचा पायाच चुकला, असं व्हायला नको याची मी पुरेपूर काळजी घेतली होती.

मला काल खुप काही दाखवायचं, त्यामागच्या कथा सांगायचं राहीलं, इतिहासाचा वेध घेताना कोणतं पथ्य पाळावं लागतं, वैयक्तीक विचार किंवा मतं बाजूला का ठेवावी लागतात हे सर्व समजावून सांगायचं होतं. पण ते राहूनच गेल, वेळ आणि दम यांचं गणित फारसं जमलं नाही हे तर खरंच, त्या ही पेक्षा माझ्या अतिउत्साहामुळेही ते राहीलं असं वाटतं। अति उत्साह या साठी, की मुंबईचा मी गेली काही वर्ष मनापासून अभ्यास
करूनही मला कोणी ‘सख्यां’च्या कालच्या आत्मियतेने कालपर्यंत कुणीच काही विचारलं नव्हतं. कुणीच जाऊ दे, घरच्यांनाही कधी उत्साहाने मुंबई दाखवायला घेऊन गेलो, की एखाद ठिकाण पाहिलं की ते मग रस्त्यावरचे फेरीवाले आणि त्यांच्या ठेल्यातल्या प्रेक्षणीय वस्तू बघायला धावतात आणि नंतर माझी भुमिका यांचं पाहाणं कधी आटोपतेय याची कंटाळी प्रतिक्षा करणारा एक चालक (गाडीचा आणि घरचाही) या पलिकडे काहीच उरत नाही. या पार्श्वभुमिवर कालचा सखी-उत्सव माझा उत्साह वाढवणारा होता व त्यामुळे मला बरंच काही सांगायचं राहीलं. पुढच्या वेळेस दुप्पट देईन ये वादा रहा..!

आपण सांगतोय ते शंकांच्या रुपात पुन्हा आपल्यापर्यंत येणं हा शिक्षकाचा बहुमान असतो असं मला वाटतं. कालच्या दिवशी मला तो बऱ्याच प्रमाणात मिळाला. त्या सर्वांनीह मला सांभाळून घेतलं, हे राहीलं-ते राहीलं अशी आठवणही करून दिलं याचं मला जास्त बरं वाटलं..शिकवताना आणि शिकताना ‘बाबा वाक्यं प्रमाणंम’ असं कधीही मानू नये व तसं काल झालं नाही ही खुपच जमेची बाब..

नावं तरी त्या कुणाकुणाची घेऊ पण त्या सर्व शिक्षक असलेल्या विद्यार्थ्यांचे मनापासून आभार. शिकवणं म्हणजे शिकणंही असतं. कुणाला मुंबई पाहायची अस्ल, तर मला अवश्य सांगा. मलाही पुन्हा पुन्हा शिकायला मिळेल हा माझा स्वार्थ समजा आणि मनुष्य तर स्वार्थी प्राणीच आहे आणि मी मनुष्यच आहे..!

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..