जगातील अस्वच्छ शहरांच्या यादीत मुंबईचे नाव असल्याचे कोठेतरी माझ्या वाचनात आले आणि माझे मन बेचैन झाले. मुंबई जर अस्वच्छ शहर असेल तर आंम्ही मुंबईकरही त्या अस्वच्छतेला कोठेतरी कारणीभूत असणारच की ! या सर्वाचा बविचार करता काही महिन्यांपूर्वी माझ्या बाबतीत घडलेला एक प्रसंग मला आठविला मी बसमधून प्रवास करीत असताना मला माझी वर्गमैत्रिण नीलम मला बसमध्ये भेटली माझ्या बाजूची सीट रिकामी असल्यामुळे ती माझ्या शेजारीच बसली सर्वसामान्य तरूणींसारखा तिने माझ्याकडे खिडकीजवळ बसण्याचा आग्रह नाही धरला. बर्याच दिवसानंतर भेटल्यामुळे आमच्या गप्पा बर्यापैकी रंगल्या होत्या ज्या आजुबाजुला उभा असणार्या तरूणी कान देऊन ऐकत होत्या. आंम्ही दोघेही बर्यापैकी चढया आवाजातच ग्प्पा मारत होतो कारण आमच्या चर्चेचा विषय सर्वसाधारणतः सार्वजनिकच होता. गप्पा मारता- मारता मी माझ्या हातातील कवितांची वही चाळ्त होतो वही चाळ्ता- चाळ्ता मला त्या वहीत मला नकोसं झालेल एक पान दिसलं. मी सवयीप्रमाणे ते पान फाडलं आणि त्याचा गोळा तयार केला. तो खंर म्ह्णजे मी बसच्या खिडकीतून बाहेरच फेकणार होतो पण तो फेकण्यापुर्वीच नीलम मला म्ह्णाली ‘तो कगदाचा गोळा खिडकीच्या बाहेर फेकू नको हा ! त्यानंतर तिने मला स्वच्छ्तेवर एक व्याख्यानच दिलं. माझ्याकडे ते ऐकाण्याखेरीज पर्यायच नव्ह्ता. आजुबाजुच्या तरूणी माझ्याकडे पाह्त गाळात गोड हसत होत्या.
— निलेश बामणे
Leave a Reply